अभिनेता सलमान खानचा भाऊ अरबाज खानने पत्नी मलायका अरोरा-खान हिच्याबरोबर घटस्फोट घेतल्यानंतरही हे दोघं बऱ्याचवेळा एकमेकांबरोबर वेळ घालवताना दिसतात. केवळ आपल्या मुलांसाठी आणि दोघांमध्ये असलेल्या मैत्रीच्या नात्यामुळे हे दोघं एकत्र दिसत असल्याचं पाहायला मिळत. या दोघांना वेगळे होऊन दोन वर्ष झाल्यानंतर आता अरबाज पुन्हा एकदा प्रेमात पडल्याचं दिसून येत आहे.

अरबाज-मलायकाचा घटस्फोट होऊन २ वर्ष उलटल्यानंतर अरबाजच्या जीवनात पुन्हा एकदा प्रेमाची पालवी फुटल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसापूर्वी अरबाजने त्याचा ५१ वा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्याची कथित प्रियसी जॉर्जिया अॅड्रियानीदेखील असल्याचं पाहायला मिळालं. इतकंच नाही तर तिने तिच्या सोशल मीडियावरदेखील हे फोटो शेअर केले आहेत.

दरम्यान, जॉर्जियाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ‘आजचा दिवस तुझा आहे. हॅप्पी बर्थडे रॉकस्टार’ असं कॅप्शन दिलं आहे. याबरोबरच तिने काही प्रेम व्यक्त करणाऱ्या इमोजीही वापरल्या आहेत. जॉर्जियाने अनेक वेळा सोशल मीडियावर अरबाजबरोबरचे फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे अरबाजदेखील त्यांच्या प्रेमाची कबुली लवकरच देऊ शकतो अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. विशेष म्हणजे अरबाज आणि जॉर्जिया हे अनेक वेळा एकत्र दिसत असून त्यांच्यासाठी हे नात खूप महत्वाचं असल्याचं पाहायला मिळतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here