अजय देवगन आणि काजोल हे सध्या सिंगापूर मध्ये आहेत. आपल्या मुलीच्या उच्च शिक्षणासाठी ते सिंगापूर मध्ये तिला सेटल करण्यासाठी गेले आहेत. त्यामुळे या दोघांनी ठरवलं आहे की आपल्या मुलीसाठी ते सिंगापूर मध्ये एक नवीन घर घेणार आहेत. मुंबई मिररच्या रिपोर्ट नुसार अजय आणि काजोल आपल्या मुलीसाठी नवीन अपार्टमेंट घेण्यासाठी सज्ज आहेत. या दोघांना Orchard Road वर एक अपार्टमेंट पसंद पडला आहे, हा शहरातील खूप वैभवशाली एरिया आहे.

न्यासा(Nyssa) जी की फक्त 15 वर्षांची आहे, ती खूप शांत आहे आणि एकट राहण्यासाठी प्रेफर करते. तिच्या शाळेत बोर्डिंगची सुविधा असतानाही ती आपल्या स्वतःच्या घरी स्वतंत्र राहणे प्रेफर करते. जानेवारी महिन्यात ती आपल्या नवीन घरात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मे 2018 मध्ये सिंगापूर येथे झालेल्या आपल्या आईच्या म्हणजे काजोलच्या Madame Tussaude या मौमच्या(wax) पुतळ्याचे अनावरण करताना मुलगी Nyssa ने Red Carpet debut दिला होता. काजोलने त्यावेळी दोघांचा फोटो ही शेअर केला होता आणि त्यावेळी लिहलं होतं की, ” My little girl with me on red carpet for the first time.” असं कॅपशन लिहलं होतं.

पुढे दोन्ही ऍक्टर्स च्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, अजय देवगन आपल्या आगामी rom-com ‘दे दे प्यार दे’ साठी रकुल प्रीत सिंग विरुद्ध काम करत आहेत. तसेच ते Akiv Ali डायरेक्ट करत असलेल्या ‘Tanaji : The unsung warrior’ च्या कामामध्ये ही व्यस्त आहेत. त्यांचे हे दोन्ही चित्रपट 2019 मध्ये रिलीज होणार आहेत आणि काजोल ही शेवटी Helicopter Eela या चित्रपटात पाहिली गेली होती, जी ह्याच महिन्याच्या सुरुवातीला रिलीज केली गेली आहे. शाहरुख खानच्या Zero मध्ये काजोलचा cameo रोल आहे, त्यातही आपल्याला काजोलला पाहायला मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here