बॉलीवूड मधील महानायक अमिताभ बच्चन यांनी नुकतंच आपल्या ब्लॉगवर त्यांनी करत असलेल्या मदतीची माहिती सर्वांना सांगितली.

अमिताभ बच्चन ज्या गरजू शेतकऱ्यांना मदत करत आहेत ते बऱ्याच काळापासून कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले आहेत. उत्तर प्रदेश सरकारने या गरजू शेतकऱ्यांची ओळख पटवून दिली आहे. हे एकूण 850 शेतकरी आहेत आणि त्यांच्या कर्जाची एकुण रक्कम ही 5.5 कोटी रुपये एवढी आहे.

आपल्या ब्लॉगवर लिहिताना बिग बी म्हणाले कि, ” उत्तर प्रदेश सरकारने 850 शेतकऱ्यांची यादी तयार केली आहे. या कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या कर्जाची एकुण रक्कम ही 5.5 कोटी एवढी आहे, हे कर्ज भरून शेतकऱ्यांच ओझं कमी करण्याचा हा क्षुल्लक प्रयत्न आहे.”

अमिताभ बच्चन यांनी नुकतंच देशासाठी लढणाऱ्या आणि शहिद झालेल्या सैनिकांच्या तसेच गरजू व्यक्तींच्या अशा 44 कुटुंबाना 2.5 कोटींची आर्थिक मदत केली होती. याचबरोबर महाराष्ट्रातील 350 शेतकऱ्यांना सुद्धा त्यांनी यापूर्वी कर्ज मुक्त केले होते. त्यांनंतर आता उत्तर प्रदेशातील 850 शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवीत आहेत. या कार्याबद्दल बोलताना बिग बी म्हणाले की हा एक ‘समाधानकारक अनुभव‘ आहे.

त्यांच्या या कार्यासोबतच ते कर्मवीर केबीसी येथे आलेले ‘अजित सिंघ‘ यांनासुद्धा मदत करणार आहेत.

अजित सिंघ हे मुलींना जबरदस्तीने वेश्याव्यवसायात पडण्यापासून वाचवणे, मुलींचे अपहरण करून या दलदलीमध्ये खेचल्या जाऊ नयेत यासाठी कार्यरत आहेत. बिग बी यांना सुद्धा मदत करणार आहेत जेणेकरून त्यांच्या या चांगल्या कार्यात त्यांना मदतीचा हात मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here