anupam kher

अभिनय क्षेत्रात स्वतःच्या विशिष्ट स्टाईलमुळे आणि अभिनयामुळे संपूर्ण बॉलीवूड क्षेत्रात ठसा उमटवणारे अनुपम खेर स्वतःचं मूल नसल्यामुळे, आपली खंत व्यक्त करताना बऱयाच वेळा आपल्याला दिसतात. अनुपम खेरच्या जीवनातील ही कमी मुंबईतील काही गरीब कुटुंबातील मुलांशी असलेल्या त्यांच्या बॉंडिंग मुळे भरून काढतात. त्या मुलांशी अनुपम खेर यांचे नाते, खूप जवळचे आहे. एकदम मोकळ्या वातावरण ती मूल एकदुसऱ्यांसोबत वावरत असताना आपण त्यांना पाहिलं आहे. अनुपम खेर सध्या 63 वर्षाचे आहेत, त्यांनी एका इंटरव्हीव्यु मध्ये बोलताना म्हटलं होती की, स्वतःच्या मुलांची कमी त्यांना भासत आहे. सिकंदर खेर हा अनुपम खेर यांचा मुलगा आहे पण तो किरण खेर यांच्या पहिल्या पतीचा मुलगा आहे.

सिकंदर बद्दल बोलताना अनुपम खेर म्हणाले,” त्यावेळी सिकंदर चार वर्षाचा होता, तो मला खूप प्रेम करायचा आणि सन्मान ही द्यायचा. माझ्या वडिलांचे माझ्यासोबत जसं नात होतं अगदी तसच नात माझं आणि सिकंदरच होतं. परंतु मला माझ्या स्वतःच्या मुलाची कमी भासत नाही असं म्हणणं चुकीचं ठरेल. मला माझ्या स्वतःच्या मुलांची कमी भासते. परंतु मी काहीच करू शकत नाही. मला कधी कधी माझा स्वतःचा मुलगा माझ्या समोर मोठा होत असलेला आंनदी भास होतो.” अनुपम खेर यांनी खूप प्रयत्न केलं मेडिकल हेल्प सुद्धा घेतली पण ते शक्य झालं नाही.

अनुपम खेर बरोबरच किरण खेर ने सुद्धा खूप प्रयत्न केले पण एवढे करून सुद्धा आम्हाला आमचं मुल होऊ शकलं नाही. 2014 मध्ये स्वतः किरण ने इंटरव्हीव्यु मध्ये सांगितले होते की, ” आम्ही दोघांनी खूप प्रयत्न केले पण काही होऊ शकलं नाही. सिकंदरला एक भावाची/बहिणीची गरज होती. पण ते शक्य झालं नाही. मेडिकल हेल्पने सुद्धा ते शक्य झालं नाही.”

किरण आणि अनुपम खेत यांची ओळख आधीपासूनच होती. ते दोघेही चंदीगड थिएटरमध्ये काम करत होते. इ.स. 1980 मध्ये किरण ही मुंबईला आली होती. इथे त्यांचा विवाह गौतम बैरी या प्रसिद्ध व्यवसायिकाशी झाला होता. 1981 मध्ये सिकंदरचा जन्म झाला होता. चार वर्षाच्या संसारानंतर त्यांना लक्षात आलं की त्यांच्या वैवाहिक जीवनात काहीही ठीक नाही. आणि दुसरीकडे असं म्हटलं जातं की अनुपम खेर यांचा विवाह मधूमालती नावाच्या मुलीशी 1979 मध्येच झाला होता. हा विवाह परिवाराच्या दबावाखाली झाला होता. जेंव्हा किरण आणि अनुपम खेर “नादिर बब्बर” नावाच्या नाटकासाठी कोलकत्ताला गेले तेंव्हा तिथे या दोघांची पुन्हा भेट झाली. इथेच अनुपम खेर ने किरण याना प्रोपोज केले आणि दोघांनीही आपापल्या पार्टनर्सला तलाक देऊन एकमेकांसोबत 1985 मध्ये विवाह केला. सिकंदरला अनुपम खेर यांनी स्वतःचं नावही दिलं.

2014 मध्ये जेंव्हा किरण BJP कडून विधायक म्हणून निवडून आली तेंव्हा आपल्या सबमिट केलेल्या अफिडेवीट मध्ये त्या दोघांनी आपली एकूण संपत्ती 33 करोड असल्याचं दाखवलं होतं. या अफिडेवीट मध्ये अनुपम खेर यांच्याकडे 42.6 लाखाची BMW आहे आणि ती इंडिया फायनांशीअल सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड कडून 17 लाखाच लोन घेऊन घेतली होती. अनुपम खेर ने आता पर्यंत 500 पेक्षाही जास्त चित्रपटात काम केलं आहे, त्यांचा पहिला चित्रपट ‘सारांश‘ मधून त्यांनी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here