फिल्म इंडस्ट्रीतील एक महत्वपूर्ण आणि दिग्गज कलाकार कादर खान यांच आज कॅनडात दुःखद निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवाचे अंत्यसंस्कार ही तेथेच केले जाणार आहे. त्यांना बऱ्याच दिवसांपासून Progressive Supranuclear Palsy हा रोगाने जखडले होते. या आजारात व्यक्तीला स्वतःचा बॅलन्स सावरता येत नाही, चालता येत नाही. हा एक डीजनरेटिव्ह आजार आहे. ते अनेक दिवसांपासून यातना सहन करत होते.अखेर आज नवीन वर्षाच्या सुरुवातीला अभिनयाच्या क्षेत्रातल्या एका खान पर्वाचा अंत झाला. आखा देश त्यांच्या या निधनामुळे दुःख व्यक्त करत आहे. कादर खानचे फॅन्स शोक व्यक्त करत आहेत. आपल्या कामाने आणि अभिनयाने अख्या भारताला भुरळ घालणारे कलाकार म्हणून कादर खान यांची ओळख आहे.

28 डिसेंबर रोजी जेंव्हा कादर खान याना दवाखान्यात दाखल करण्यात आलं होतं तेंव्हा अनेक मोठ्या हस्तिनी त्यांच्या जलध सुधारणेसाठी प्रार्थना केल्या होत्या. त्यात अमिताभ बच्चन यांचा सुद्धा समावेश आहे. अमिताभ बच्चन यांनी 28 डिसेंबर रोजी ट्विटर वरून त्यांची प्रकृती लवकर ठीक होण्याकरिता प्रार्थना केली होती. अमिताभ बच्चन आणि कादर खान यांनी सोबत अनेक चित्रपटात काम केलं आहे त्यातील काही चित्रपटाची नावे पुढे दिली आहेत; दो और दो पांच, मुक्कदर का सिकंदर, मिस्टर नटवरलाल, सुहाग, कुली आणि शहेनशहा आशा अनेक चित्रपटात दोघांनी काम केलं आहे.

अमिताभ बच्चन यांचं ट्विटर वरील ट्विट ,”Kader Khan… actor writer of immense talent… lies ill in Hospital… Prayer and duas for his well being and recovery… Saw him perform on stage, welcomed him and his prolific writing for my films. Great company, a libran and many not know, taught Mathematics,” आशा प्रकारचं होतं.

कादर खान यांचा जन्म काबुल (सध्या अफगाणिस्तान) येथे झाला होता. आपल्या फिल्म कारकिर्दीची सुरुवात त्यांनी चित्रपट ‘दाग’ मधून केली. या चित्रपटात राजेश खन्ना हे लीड रोल मध्ये होते. 1973 मध्ये जेंव्हा कादर खान यांनी आपल्या चित्रपटातील कारकिर्दीला सुरुवात केली, त्यानंतर जवळपास एकूण 300 पेक्षा जास्त चित्रपटात काम त्यांनी नंतरच्या दशकात केलं आहे. आपल्या या कारकिर्दीत त्यांनी अनेक अवॉर्ड आपल्या नावे घेतले. ‘अंगार’ तसेच ‘बाप नंबरी बेटा दस नंबरी’ या चित्रतातील त्यांच्या भूमिका ह्या शिरोभागी होत्या.

त्यांनी लिहिलेले काही सुप्रसिद्ध डायलॉग्ज खाली दिले आहेत.

कादर खान याना ‘Man of Many Talent’ या नावाने ही ओळखलं जातं. कारण फक्त अभिनयातच ते अग्रेसर नाहीयेत तर ते लिहिन्यातही अग्रेसर आहेत. त्यांनी आतापर्यंत जवळपास 250 चित्रपटांसाठी डायलॉग रायटिंगचे काम केले आहे. कादर खान यांचे रायटिंग क्षेत्रातील सहकारी मनमोहन देसाई आणि प्रकाश मेहरा होते. त्यांच्या सोबत मिळून त्यांनी अनेक चित्रपटांचे रायटिंग चे काम केले आहे. त्यात ‘धर्म-वीर’, ‘ सुहाग’, ‘गंगा जमुना सरस्वती’, ‘ कुली’, अमर अकबर अँथनी’ आणि ‘पर्वरीश’ सारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

प्रकाश मेहरा बरोबर त्यांनी ‘ ज्वालामुखी’, ‘शराबी’, ‘ लावारीस’ आणि ‘मुक्कदर का सिकंदर’ चित्रपटांसाठी लिहिण्याचं काम केलं आहे आणि तसेच त्यात काम ही केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here