अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत पतीच्या पावलांवर पाऊल टाकत लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार असल्याच्या बऱ्याच चर्चा आजवर झाल्या. या चर्चा खऱ्या ठरल्या असून एका सौंदर्यप्रसाधनाच्या जाहिरातीत ती झळकली आहे. या जाहिरातीचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या जाहिरातीतील मीराच्या अभिनयाची अनेकांनी प्रशंसा केली आहे. अभिनयाचा पहिला प्रयत्न असला तरी ती अत्यंत आत्मविश्वासाने केली असल्याचं पाहायला मिळत आहे. करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये मीरा आणि शाहिद एकत्र दिसले होते. इतर कार्यक्रमांप्रमाणेच यावेळीही मीरा कॅमेरासमोर अतिशय आत्मविश्वासाने वागताना दिसली. चित्रपटसृष्टीशी दूरदूरपर्यंत संबंध नसतानाही तिने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.