गोविंदा म्हणतो माझ्या आत्मकथेची सुरुवात ही माझ्या आई पासून होते. आणि त्यामुळेच माझ्या आत्मकथेचं नाव ही माझ्या आईच्या नावावरूनच असेल, असं गोविंदा म्हणाले.

बॉलीवूड इंडस्ट्रीत आपल्या स्टाईल, अभिनय आणि डान्स ने आपला ठसा उमटवणारे सुप्रसिद्ध सुपरस्टार गोविंदा आपल्या येणाऱ्या चित्रपटामुळे चांगलेच चर्चेत आहेत. त्या चित्रपटाच नाव ‘रंगीला राजा‘ आहे. या चित्रपटाच्या प्रचारासाठी जोर लावून काम करत आहेत. परंतु नुकतंच नवभारत टाईम्स सोबत झालेल्या इंटरव्हीव्यु मध्ये स्वता बद्दल त्यांनी म्हटल. ते म्हणाले की मी माझी आत्मकथा लिहायला सुरुवात करणार आहे आणि येत्या काही वर्षांत ती लिहून पूर्णही केली जाईल.

पुढे गोविंदा म्हणतात,” मी माझी आत्मकथा तेंव्हाच लिहून पूर्ण केली असती, जर मला बाहेरून पैसे मिळाले नसते. सध्यातरी मी 3 ते 4 वर्ष काहीच लिहिणार नाही. मी जेव्हा 57 – 58 वर्षांचा होईन त्यावेळी मात्र मी माझी आत्मकथा लिहायला सुरुवात करेन. माझी आत्मकथा ही मार्केट लक्षात ठेवून तयार केलेली नसेल, ती विकाऊ नसेल. विकण्याच्या ही काही गोष्टी असतात. मी माझ्या जीवनातला कोणताही क्षण विसरत नाही, मला सर्वकाही लक्षात आहे. मी खूप गायत्री मंत्राचा जप करतो, त्यामुळे ही मला सर्व लक्षात राहते.”

गोविंदाने सांगितले की त्यांच्या आत्मकथेची सुरुवात ही त्यांच्या आई पासून होईल. या आत्मकथेच्या नावाबद्दल बोलताना गोविंदा म्हणाले की, माझ्या आत्मकथेच नाव ही माझ्या आईच्या नावावरूनच असेल. मी आवर्जून सांगतो की ज्या कोणीही व्यक्तीने माझ ते पुस्तक वाचलं असेल, तो त्याच्या आई सोबत कधीच गैरव्यवहार करणार नाही.

गोविंदाच्या येणाऱ्या चित्रपटाचं निर्देशन पहलाज निहलानी यांनी केलं आहे. या चित्रपट येत्या 16 नोव्हेंबर रोजी रिलीज करण्यात येणार आहे. या चित्रपटात गोविंदा सोबतच शक्ती कपूर ही असणार आहेत. बघावं लागेल ही राजा बाबू जोडी पुन्हा एकदा लोकांना भुरळ पाडेल की नाही. त्यांच्या येणाऱ्या या चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here