कॉमेडीचा किंग कपिल शर्माचे लवकरच होणार दोनचे चार हात. होय, कपिल शर्मा लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. 12 डिसेंबर रोजी कपिल शर्माच लग्न होणार आहे. कपिल शर्माच लग्न गिन्नी चतरथ हिच्या बरोबर होणार आहे. कपिल शर्माच्या वेडिंग कार्डची इनसाईट फोटो बाहेर आली आहे. सोशल मीडियावर ती सध्या फिरत आहे. लाल आणि बदामी रंगाच्या पत्रिकेवर कमळ, हत्ती आणि महलाचे चित्र आहे. तसेच सोनेरी रंगाच प्लेटेड वर्क करण्यात आलं आहे. विशेष गोष्ट ही आहे की, कपिल शर्माने लग्न पत्रिकेसोबतच नातेवाईक आणि जवळच्याना तोंड गोड करता यावा म्हणून मिठाई, ड्रायफ्रूट आणि आणखी बरच काही पाठवण्यात आली आहे.

2 डिसेंबर रोजी कपिल आणि गिन्नी यांच्या लग्नातील पहिला कार्य सोहळा पार पडला. अमृतसर येथे हा कार्यक्रम करण्यात आला. 12 डिसेंबर रोजी लग्नानंतर जेवणाच्या कार्यक्रमाला बरेच जण हजेरी लावणार आहे. या कार्यक्रमासाठी कपिल शर्मा तब्बल 15 लाख खर्च करत असल्याचं समजत आहे. यामध्ये शाकाहारी तसेच मांसाहारी दोन्ही प्रकारचे व्यंजन असतील. या कार्यक्रमात 100 पेक्षा अधिक प्रकारचे व्यंजन ठेवण्यात आले आहेत.

लग्नाआधी 10 डिसेंबर रोजी देवीच्या जागरणाचा कार्यक्रम होणार आहे. ज्यामध्ये लोकप्रिय सिंगर ऋचा शर्मा भजन गायन करणार आहे. त्यांच्या बरोबर पंजाबी गायक मास्टर सलीम सुद्धा गायनाला उपस्थित राहणार आहेत. जागरणाच्या दुसऱ्या दिवशी बांगड्या भरण्याचा कार्यक्रम, मेहंदी आणि कॉकटेल हे कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. लग्नादिवशी गुरुदास मान ही त्यांची गायनाची महफील सजवतील. 14 डिसेंबर रोजी होणाऱ्या अमृतसर मधील पहिल्या रिसिपशन मध्ये दलेर मेहंदी परफॉर्म करणार आहेत.

कपिल शर्माची होणारी पत्नी जालंधर मधील गुरुनानक नगर मध्ये राहते. त्यामुळेच कपिल ने त्याच्या लग्नाचे ठिकाण जालंधर ठेवले. त्यामुळेच जालंधर मधील कबाना रिसॉर्ट और स्पा ज्याला क्लब कबाना म्हणूनही ओळखलं जातं, ते दोन दिवसांसाठी बुक करण्यात आलं आहे. येथेच मेहंदी, संगीत आणि फेरे घेण्याचा तसेच छोटं रिसेप्शनही होणार आहे.

कपिल शर्मा बॉलीवूड इंडस्ट्री मधील दिगग्ज कलाकारांना आपल्या लग्न समारंभात बोलावणार आहे. त्यात अमिताभ बच्चन, शाहरुख खान, दीपिका पादुकोण, अक्षय कुमार इत्यादी यांचा समावेश आहे. या सर्वांना इनंव्हीटेशन देण्याची प्लॅनिंग कपिल करत आहे. यापैकी अमिताभ बच्चन आणि रेखा याना कपिलने स्वतः इंव्हीटेशन दिलं आहे. आतापर्यंत कपिलकडे 150-200 जणांची लिस्ट आहे, ज्यांना ते इन्व्हाईट करणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here