बॉलीवूड अभिनेता महानायक अमिताभ बच्चन हे आपल्या सोशल मीडियावरील फॉलोअर्सना खूप प्रेम करतात आणि त्यांना खूप आदरही देतात. अमिताभ बच्चन यांची सोशल मीडियावर आपले फॉलोअर्स कमी होण्याच्या संदर्भात अनेक अँग्री क्षण सुद्धा आहेत. आपल्याला ट्विटर वर अमिताभ बच्चन यांची ते ट्विट पाहायला ही मिळतात.

https://twitter.com/SrBachchan/status/991765511728852992/photo/1

https://twitter.com/SrBachchan/status/958763306075877377/photo/1

 

बॉलीवूड कलाकार हे सुद्धा इंटरनेटच्या जाळ्यात पूर्णतः अडकलेले आपल्याला दिसतात. प्रत्येक जण ट्विटर किंवा दुसरे कोणते तरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे वापरतच असतात. याद्वारे ते आपल्या बद्दल नवीन अपडेट किंवा आपली नवीन फोटो त्यांच्या फॅन्स ला दाखवत असतात, आणि त्यांच्या कडून शुभेच्छा मिळवत असतात.

https://twitter.com/SrBachchan/status/992482035305365504/photo/1

मायक्रोब्लॉगिंग साईट वर रेग्युलर असून सुद्धा अमिताभ बच्चन यांचे ट्विटर फॉलोअर्स मध्ये घट दिसत आहे, यामुळे अमिताभ बच्चन ट्विटर वर संतापले आहेत. आणि त्यांनी ट्विटरच्या फॉलोअर्स मध्ये कधीही, कसलीही घट होत नाही, असे मार्मिक वाक्य ही अमिताभ बच्चन यांनी बोलले. यांवर ट्विटरच्या अधिकाऱ्यांनी लगेच अमिताभ बच्चन याना फॉलोअर्स संख्येतील घट का झाली याचे स्पष्टीकरण ही दिले गेले.

https://twitter.com/SrBachchan/status/965279482872455168/photo/1

याचे स्पष्टीकरण देऊन सुद्धा अमिताभ बच्चन यांनी ‘कौन बनेगा करोडपती’ च्या 10 व्या सिजन मधील ट्विटर फॉलोअर्स ची संख्या कमी झाल्याचे ते बोलले. 29 ऑक्टोबरच्या एपिसोड मध्ये जेंव्हा एका पार्टीसिपंटने अमिताभ बच्चन याना तुम्ही ट्विटर हायेस्ट फॉलोअर्स असणारे सिलिब्रिटी आहेत असे विचारले असता, अमिताभ बच्चन यांनी उत्तर दिले की, असं काही नाहीये, माझ्यापेक्षा जास्त फॉलोअर्स असणारे लोकही आहेत, जसं की बराक ओबामा , ख्रिस्तीणो रोनाल्डो,नरेंद्र मोदी.