मिका सिंग हा भारतात एक प्रसिद्ध सिंगर आहे. बॉलीवूड मधील त्याचे अनेक गाणे लोकांना खूप आवडतात. मात्र त्याच मिक सिंगला दुबईत अटक करण्यात आली आहे. एका ब्राझीलीयन तरुणीला अश्लील फोटो पाठवल्या प्रकरणी मिका सिंगला दुबईत अटक करण्यात आली आहे.

माहितीनुसार अशी माहिती समोर आली आहे की, गुरुवारी पहाटे 3 वाजता दुबईतील बुर्ज दुबई मधून मिकाला अटक करण्यात आली. मुरक्काबाद पोलीस स्टेशन मधील लॉकअप मध्ये सध्या मिका सिंगला ठेवण्यात आलं आहे. 17 वर्षाच्या मुलीला मिका सिंगने अश्लील फोटो पाठवले होते. त्यामुळे त्या मुलीने पोलीस स्टेशन मध्ये मिका सिंग विरुद्ध तक्रार दाखल केली होती. मिका सिंगचा दुबईत कार्यक्रम होता, तो परफॉर्म करण्यासाठीच मिका सिंग दुबईत आला होता. तसेच मिका सिंगचे मित्र मिका सिंगला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

मिका सिंग हा नेहमी वादाच्या भोवऱ्यात अडकलेला असतो. 2006 मध्ये मिका सिंगने आपल्या वाढदिवसादिवशी राखी सावंतला लिपलॉक किस ही केले होते. त्यावेळी राखी सावंत कोर्टात ही गेली होती. अनेक दिवस हे प्रकरण मीडिया मध्ये चर्चेत होते.

त्यानंतर एका लाईव्ह इव्हेंट मध्ये डॉक्टरला चापट मारल्या प्रकरणी ही तो खूपच चर्चेत होता. हे प्रकरण 2015 मध्ये दिल्लीत झाल होतं. यावर मिका म्हणतो की डॉक्टरला नको म्हटलं असतानाही तो महिला सोबत डान्स करत होता. दुसरीकडे 2014 मध्ये मिका वर हिट अँड रन केस ही असल्याचा आरोप आहे. मिका ने एका ऑटोरिक्षाला धडक दिली होती. त्यावेळी ऑटोतील प्रवाशांना ही दुखापत झाली होती.

2013 मध्ये मिकावर कस्टम चोरीचा ही आरोप आहे. मुंबई एअरपोर्ट वर मर्यादेपेक्षा जास्त विदेशी चलन बालगल्याप्रकरणी मिकाला अटक करण्यात आली होती. नंतर त्याला जामीन मिळाला ही गोष्ट वेगळी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here