रघु राम ने आपल्या आणि कॅनेडियन सिंगर Natalie Di Luccio च्या लग्नाबद्दल जाहीर केले गेले आहे. येत्या डिसेंबर मध्ये हे कपल लग्नाच्या बंधनात अडकणार आहे.

रघु राम ने Natalie Di Luccio सोबत आपल्या होत असलेल्या लग्नाची माहिती दिली गेली. त्याने इन्स्टाग्राम वर आपली आणि Natalie च्या एका स्केचचा फोटो शेअर केला आहे. या फोटो मध्ये दोघांनी लग्नातील ड्रेस परिधान केला आहे. या पोस्ट मध्ये ” December2018″ असं लिहिलं आहे. सूत्रांच्या माहितीवरून असं कळतंय की हे दोघे गोवा येथे लग्न करणार आहेत.

Natalie ने नुकतंच एक फोटो इन्स्टाग्राम वर शेअर केला होता. त्या फोटो मध्ये रघु राम आपल्या गुडघ्यावर आहे आणि त्याच्या समोर Natalie उभी आहे. ते दोघेही दक्षिण आफ्रिकेत आहेत. त्या पोस्ट मध्ये Natalie ने “That time he went down on his knee. I said yes,” असे लिहिले आहे.

Natalie आणि रघु यांचा याच वर्षी ऑगस्ट मध्ये साखरपुडा झाला होता. त्यांच्या या एंगेजमेंट पार्टीला फक्त त्यांचे जवळचे मित्रच हजर होते. TV ऍक्टर करणवीर बोहरा आणि त्याची पत्नी तिजय सिंधू या कार्यक्रमात हजर होते. या दोघांनी कार्यक्रमाचे फोटो शेअर केले होते.

https://www.instagram.com/_u/instaraghu/?utm_source=ig_embed&ig_mid=W6dnMgABAAGDsUqLHN_6JM0gSg-2

तिजय सिंधू लिहिते, ” आम्ही दोघे टोरंटो वर असण्याचं एकमेव कारण म्हणजे आम्ही आमच्या प्रिय मित्रांना एंगेज्ड होताना पाहण्यासाठी उत्सुक होतो. मी ज्यांना प्रेम करते त्यापैकी हे दोघे आहेत. ही खूप प्रेमळ, खूपच मनमिळाऊ आणि खूपच हुशार जोडी आहे. जर कोणी आनंद मिळायच्या लायक असेल तर ते दोघेच आहेत. मी खूप आनंदी आहे, की तुम्ही दोघे लवकरच एंगेज्ड झाला आहात.”

Natalie ही एक कॅनेडियन सिंगर आहे. तिने बॉलीवूड मधील English Vinglish, लेडीज वर्सेस रिकी बहल आणि चेन्नई एक्सप्रेस या चित्रपटाचे गाणे तिने म्हटले आहे. तिने काही तामिळ गाणे ही गायले आहेत. रघु आणि Natalie या दोघांनी ‘आंखो ही आंखो में’ या गाण्याच्या रेकॉर्डींग मध्ये 2016 मध्ये एकत्र काम केले होते. Natalie ही आधी TV ऍक्टर Eijaz Khan याच्या सोबत रिलेशनशिप मध्ये होते. रघुचं ही हे दुसरं लग्न आहे. याआधी रघुने ऍक्टरेस सुगंधा गर्ग बरोबर लग्न केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here