१००० कामगारांनी मिळून तयार केला होता चित्रपटाचा सेट

रजनीकांत आणि अक्षय कुमार यांचा “2.0” हा चित्रपट भारतामधील सर्वात महागडा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाचा एकूण खर्च ५४३ करोड इतका आहे. यापूर्वी बाहुबली-२ चा एकूण खर्च 250 करोड इतका होता.

‘2.0’ मध्ये हेवी व्हीएफएक्स चा वापर केला गेला आहे. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रक्षेपित करण्यात आला आहे. ज्यामध्ये दाखवलं गेल आहे कि, डॉक्टर टेलीकॉम कंपनीचा सूड घेण्यासाठी पूर्ण शहरातील मोबाईल हिसकावून घेतो. या सीनमध्ये निर्मात्यांनी १ लाख मोबाईल फोनचा वापर केला आहे. या चित्रपटाची शुटींग सुरु होण्याअगोदर नोकिया या कंपनीचा चेन्नई मधील कारखाना बंद पडला होता. निर्मात्यांनी ठरवलं कि त्या कारखान्यातील सर्व फोन कमी भावामध्ये विकत घ्यायचे आणि सोबतच डम्मी फोन जमा करायचे. सध्या चित्रपटाची शुटींग पूर्ण झाली आहे आणि प्रोडकशन टीम जवळ १ लाख फोन जमा आहेत. हा चित्रपट १३ भाषेत प्रदर्शित केला जाणार आहे. अक्षय कुमार या चित्रपटामध्ये निगेटिव्ह रोल करत आहेत.

 

५० करोड मध्ये बनला फिल्मचा सेट

चित्रपटाच्या शुटींग दरम्यान ५० करोड रुपयांचा भव्य सेट उभा करण्यात आला होता. सुरुवातीस सेटचा खर्च ३२ करोड इतकाच होता, परंतु नंतर १० करोड काही खास वस्तूमध्ये आणि ६ करोड वाहनावर इनवेस्ट करण्यात आले. चित्रपटाचा सेट हा चेन्नईच्या १००० कामगारांनी मिळून तयार केला आहे. सेटचे भाग हे एव्हीपी फिल्म सिटी, गोकुलम स्टुडीओ, प्रसाद स्टुडिओ मध्ये बनवले आहेत.

 

सेट वर बनविला अडीच किलोमीटर  चा रोड.!

चित्रपटाचे प्रोडक्शन डिझाइनर मथुराज सांगतात की, “चित्रपटासाठी ही मेट्रो सिटी आहे आणि यासाठी आम्ही ३५ फुट उंच स्ट्रक्चर बनवले आणि नंतर कॉम्पुटर ग्राफिक्स च्या मदद्तीने उंच इमारती सारखे दाखवले स्टुडीओ मध्ये एक रस्ता हि बनवण्यात आला आहे ज्याची लांबी अडीच किलोमीटर इतकी आहे आणि खऱ्या रस्त्यावर रजनी सर सोबत शुटिंग नाही करू शकत, यासाठी हा सेट बनवणे गरजेचे होते ”.

रोबोटिक लॅब आणि फुटबॉल स्टेडियमचा हि सेट बनवला.!

टीम ने स्टुडीओ मध्ये रोबोटिक लॅब आणि वर्कशॉप हि बनवला. स्टुडीओ मध्ये जवाहरलाल नेहरू स्टेडियम, फुटबॉल मैदान बनवण्यात,याशिवाय ४० दिवस दिल्ली मध्ये फुटबॉल स्टुडिओ मध्ये शुटींग केली गेली. येथे भरपूर ऍक्शन सीन शूट केले गेले आहे. कार आणि विस्फोटक गोष्ठी बाहेर केल्या जाऊ शकत नाही म्हणून स्टुडिओ मध्येच शूट केल्या गेल्या. एक फाइट सीन ज्यामध्ये चिट्टी आर्मी सोबत लढत आहे त्यासाठी T-70 टेकचा डुप्लीकेट हि बनवला. हा चित्रपट २९ नोव्हेंबर रोजी रिलीज करण्यात येईल.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here