खूप दिवसांपासून चर्चेत असलेले रणवीर आणि दीपिका हे बॉलीवूड कपल लवकरच लग्नाच्या बंधनात बांधले जाणार आहेत. या दोघांच्या लग्नाच्या नुसत्या बातम्याच आजपर्यंत आपण ऐकत होतो, परंतु नेमकी तारीख आपणास माहिती नव्हती. फिल्मफेअर यांच्या मार्फत मिळालेल्या माहिती नुसार रणवीर आणि दीपिका हे येत्या २० नोव्हेंबर रोजी लग्न करणार आहेत.

रणवीर आणि दीपिका हे २०१३ पासून रिलेशनशिप मध्ये होते आणि आता हे रोमँटिक कपल आपले डेस्टिनेशन लग्न इटली मधील ‘लेक कोमो’ येथे करणार आहेत. काही महिन्यापूर्वी दीपिका आणि रणवीर यांचे आई वडील यांची भेट झाली होती, आणि आता दीपिका ने तिच्या लग्नाची खरेदी सुद्धा सुरु केली आहे.

दोन्ही सिनेतारकांचे फॅन्स त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. यांचे लग्न सुद्धा विराट आणि अनुष्का यांच्या लग्नासारखे होईल अशी शक्यता आहे.