‘जिसकी कुक्कू, उसकी बंबई.’ ‘हालांकि कुक्कू अपना जादू बताती नहीं क्योंकि जादू बताते ही जादू का असर खत्म हो जाता है.’ असे ‘सेक्रेड गेम्स’ मधले कुक्कू वरचे हिट डायलॉग अनेकांना पाठ आहेत. कुक्कू आपल्या जादूचं गुपीत जरी सांगत नसली तरी कुक्कू साकारणाऱ्या कुब्रा सैतनं तिचे अनेक अनुभव शेअर केले आहे.

सेक्रेड गेम्स वेबसिरिज हिट झाली, पुढच्या भागांवर बंदी आल्यानं एका रंजक वळणावर येऊन ही वेबसिरिज संपली. आता चाहते पुढच्या भागांची प्रतीक्षा करत आहेत. या सिरिजमधले अनेक पात्र प्रेक्षकांच्या पसंतीचा विषय ठरले आहेत त्यातलीच एक म्हणजे कुब्रा सैत होय. या वेबसिरिजमध्ये कुब्रानं टान्सजेंडरची भूमिका साकारली आहे. कुब्राची भूमिका प्रेक्षकांवर इतकी छाप सोडणारी होती की कुब्रा खरंच ट्रान्सजेंडर आहे का ?असेही प्रश्न काहींनी तिला थेट विचारले. ही आपल्या अभिनयाची पोचपावती असल्याचं कुब्रा म्हणते.

पण, कुब्राच्या यशामागची खरी जादू तिनं नुकतीच ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितली. ‘या भूमिकेसाठी मला फक्त माझ्या डान्सवर अधिक लक्ष द्यावं लागलं. माझं डान्स खूपच वाईट त्यामुळे चांगल्या प्रकारे डान्स करणं हे माझ्यासाठी खरंच आव्हानात्मक होतं.कुब्रा ट्रान्सजेंडर आहे, मी प्रत्यक्षातही टॉमबॉयसारखीच वागते त्यामुळे अभिनयात वेगळं असं मला काही द्यावं लागलं नाही, फक्त आवाजाकडे मी आणखी लक्ष दिलं. तो आवाज पुरूषासारखा किंवा अगदीच महिलेसारखा नसावा अशी भूमिकेची गरज होती म्हणून या बारिकसारिक गोष्टींकडे मी लक्ष द्यायला सुरूवात केली आणि यातून कुब्रा उभी राहिली.’असं ती म्हणाली.

कुब्राच्या अभिनयाचं कौशल्य पाहून करिनानंही तिचं कौतुक केलं होतं. कुब्रा आणि नवाजुद्दीन सिद्दीकी या दोघांमध्ये चित्रित करण्यात आलेल्या एका दृश्यासाठी कुब्राला सात ते आठ वेळा नग्न होऊन सिन द्यावे लागले होते. यामुळे दुखावलेल्या कुब्रानं आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या, मात्र त्याच दृश्यात कुब्रानं दिलेल्या अप्रतिम अभिनयामुळे अनेक कलाकरांनी तिचं कौतुक केलं होतं.