बॉलिवूड मधील भाई सलमान खान यांचे पाळीव प्राण्यांवर खूप प्रेम आहे. हे आपण त्यांच्या सोशल मीडिया वरील पोस्ट्स मधून पाहतच असतो. सलमान कडे भरपूर पाळीव प्राणी आहेत त्यात कुत्र्यांची संख्या जास्त आहे. गुरुवारी रात्री सलमानच्या सर्वात लाडक्या डॉग चा मृत्यू झाला. तिचे नाव ‘My Love‘ असे होते. सलमानने त्या रात्री डॉग चा फोटो शेअर करून आपले दुःख सोशल मीडियावर शेअर केले.

My Love हि एक Neapolitan Mastiff जातीची कुत्री होती. अशा पद्धतीची कुत्री हि संरक्षक आणि भीतीदायक म्हणून प्रसिद्ध आहेत. सलमान ने गुरुवारी रात्री आपल्या इंस्टाग्राम वरून या डॉग सोबतचा फोटो शेअर केला आणि त्यासोबत असं लिहिलं कि, “My most beautiful my love gone today. God bless her soul.”

View this post on Instagram

My most beautiful my love gone today. God bless her soul.

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

या फोटो नंतर सलमान ने ट्विटर वरून आणखी एक फोटो शेअर केला.

या सर्व फोटो पाहून सांगण्याची गरज नाही कि सलमान आपल्या प्राण्यांशी किती प्रेम करायचा. काही महिन्यापूर्वी जेंव्हा सलमान ची ‘रेस ३’ रिलीज झाली होती तेंव्हा सुद्धा सलमान या डॉग चा फोटो शेअर केला होता. त्या फोटो सोबत असे लिहिले होते, ‘OMG! MyLove watching the song Selfish…Hahhha.” या फोटो मध्ये डॉग सलमान चे गाणे पाहत असताना दिसेल.

या सर्व फोटो शेअर करून सलमान ने आपल्या डॉग साठीचे आपले प्रेम व्यक्त केले आहे. 2009 मध्ये जेंव्हा सलमान चे 2 डॉग MySon आणि MyJaan डेड झाले, तेंव्हा सलमान ने त्यांच्यासाठी गॅलॅक्सी अपार्टमेंट जवळ त्यांच्यासाठी मेमोरियल बनवले होते.

सलमान बरोबरच सोनाक्षी सिन्हा ने सुद्धा My Love चा फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केला

सलमान सध्या ‘भारत’ या चित्रपटाचे शूट करत आहेत त्यासोबतच ते बिग बॉस मध्ये होस्ट म्हणून सुद्धा काम करीत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here