सोनाक्षी सिन्हा हिने नुकतंच बॉलीवूड अभिनेता विक्की कौशल याच्या सोबत ‘Brights Today‘ मॅगझीन साठी फोटो शूट केली आहे. असं म्हटलं जातंय की सोनाक्षी सिन्हाचा आतापर्यंतच्या फोटो शूट पेक्षा हा फोटो शूट वेगळा आहे. तसेच या फोटो शूट दरम्यान सोनाक्षी सिन्हा आणि Brights Today मॅगझीनच्या एडिटर नुपूर मेहता सोबत अनेक विषयांवर चर्चा झाली. त्यात एक मनोरंजक विषय होता की, सोनाक्षी सिन्हाच्या ड्रीम मॅन बद्दल.

यावर बोलताना सोनाक्षी सिन्हा म्हणते, ” तो कोणीही असो, मला त्याने पूर्ण स्पेस द्यावं आणि मला कोणत्याही बंधनात अडकवू नये. कधीही चुकीच्या कारणामुळे लग्न करू नये.” याच इंटरव्हीव्यु मध्ये आपल्या क्रश बद्दल बोलताना सोनाक्षी सिन्हा म्हणाली की,” मला सुरुवातीपासूनच ऋतिक रोशन वर क्रश आहे.”

या फोटोशूट मध्ये विक्की कौशल सोबत काम करण्याच्या गोष्टीबद्दल बोलताना सोनाक्षी सिन्हा म्हणाली, ” विक्की कौशल हे खूपच प्रभावशाली व्यक्ती आहेत. मला त्यांच्याबरोबर काम करताना खूपच मजा आली.”

सोनाक्षीच्या एक्टींगच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती तिच्या आगामी चित्रपट ‘दबंग 3‘ च्या शूटिंगच्या तैयारीमध्ये व्यस्त आहे. सोनाक्षी पुन्हा एकदा सलमान खान बरोबर ‘दबंग 3’ मध्ये दिसणार आहे. दबंग 3 ची शूटिंग लवकरच सुरू होणार आहे.

सोनाक्षी सिन्हा ही खूप मेहनती ऍक्टरेस आहे, बॉलीवूड मध्ये आपल्या वडिलांच्या म्हणजे शत्रूघन सिन्हा च्या नावावर तिची ओळख झालेली नाहीये, ती स्वतः आपल्या कलाकारीने आणि मेहनतीने स्वतः चे नाव या इंडस्ट्री मध्ये केलं आहे. अनेक मोठं मोठ्या कलाकारांनी तिच्या कामाचे कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here