sonali bindre

सोनाली बेंद्रेला कॅन्सर झाला आहे ही गोष्ट कळताच संपूर्ण भारतातून हळहळ व्यक्त केली जात होती. सर्व फॅन्स ला धक्काच बसला होता. सोनाली बेंद्रेने स्वतःहून सोशल मिडियाद्वारे आपल्या फॅन्सना आपल्याला कॅन्सर असलेली बातमी सांगितली होती. हे लक्षात येताच ताबडतोब सोनाली बेंद्रेने न्यूयॉर्क कडे उपचारासाठी प्रस्थान केले. न्यूयॉर्क वरून सतत तिच्या शरीराची आणि कॅन्सर सोबत असलेली लढाईची बातमी सोशल मिडियाद्वारे लोकांना कळत होती.

ज्या वेळी सोनाली बेंद्रेला, आपल्याला कॅन्सर आहे ही गोष्ट कळाली त्यावेळी ती ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाज‘ या शो मध्ये जज ची भूमिका करत होती. उपचारासाठी सोनाली बेंद्रेला हा शो अर्ध्यातच सोडून जावं लागलं. सोनालीचे फॅन्स लवकरात लवकर सोनाली बरी होऊन वापस यावी या गोष्टीची वाट पाहत बसले आहेत. मागच्या काही दिवसांत ऋषी कपूर, अनुपम खेर आणि प्रियांका चोपडा हे मोठे कलाकार तिला पाहण्यासाठी न्यूयॉर्क पोहचले होते. सोनाली ने या सर्वांसोबतचा फोटोही सोशल मीडियावर शेअर केला होता. नुकतंच ऍक्टरेस नम्रता शिरोडकर सुद्धा सोनालीला पाहण्यासाठी तेथे पोहचली.

नम्रता शिरोडकर खर तर आपले पती महेश बाबू आणि मुलांबरोबर सुट्ट्यांमध्ये न्यूयॉर्कला आली होती आणि न्यूयॉर्कला पोहचल्यानंतर ती सोनाली बेंद्रेला भेटली. सोनालीच्या तब्बेते विषयी बोलताना नम्रता शिरोडकर म्हणाली की, सोनालीची तबीयत खूप वेगाने सुधारत आहे आणि ती येत्या डिसेंबर मध्ये भारतात परतू ही शकेल, असंही ती म्हणाली.

नम्रताने सोनाली सोबत 2 तास चर्चा केली. हा तिचा क्वालिटी टाइम होता असंही नम्रता म्हणाली. तसेच सोनाली एक स्ट्रॉंग महिला आहे आणि ती यादिवसात खूपच फिट दिसत आहे. लवकरच ती सामान्य जीवन जगण्यासाठी ती तैयार असेल. आम्ही बसून खूप बातचीत केली, असं नम्रता म्हणाली. नम्रताने सोनाली सोबत कसलाही फोटो काढला नाही, याबद्दल विचारले असता नम्रता म्हणाली की, मला तसं करण योग्य वाटलं नाही, पण मी तिच्यासोबत फोटो काढू इच्छित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here