बॉलीवूड अभिनेत्री सनी लियोनी यांनी सुद्धा #metoo मूव्हमेंट मध्ये सहभाग घेत त्यांच्या आयुष्यातील हा आश्चर्यकारक खुलासा केला आहे. काही दिवसांपूर्वीच बॉलीवूड अभिनेत्री ‘तनुश्री दत्ता’ याच विषयावरून चर्चेत होती. #metoo मूव्हमेंट म्हणजे ही एक सोशल मीडियावरील मूव्हमेंट आहे, जी की लैंगिक अत्याचाराला सामोऱ्या गेलेल्या महिलांनी चालवली आहे. यामध्ये अनेक प्रसिद्ध अभिनेत्र्यांनी देखील सहभाग नोंदवला आहे आणि आपल्या सोबत काय घडले आहे याबाबत खुलासा केला आहे. त्यांनंतर लगेचच सनी लियोनीने सुद्धा आपल्या लैंगिक अत्याचाराबाबत खुलासा केला आहे.

सनी लियोनीने ‘BuzzFeed News’ मेडियाशी बोलत असताना सांगितले की, ही घटना तेंव्हाची आहे जेंव्हा ती 18 वर्षाची होती. त्यावेळी ती आपला पहिला म्युझिक व्हिडीओ शूट करत होती आणि या शूट साठी ती खूप आनंदी आणि उत्सुक होती. या व्हिडीओचा बराच भाग शूट करून पूर्ण झाला होता आणि तेवढ्यात एक व्यक्ती वारंवार तिच्या जवळ येऊन तिला त्रास देत होता, अश्लील चाळे करीत होता, तिची छेड काढत होता. सनीने त्याला बऱ्याच वेळा ताकीदही दिली, पण तो माणूस समजायला काही तयारच नव्हता. सनीने ताकीद देऊन सुद्धा तो काही शांत बसेना. नंतर मात्र पाणी डोक्यावरून जात आहे हे लक्षात घेऊन तिने हिम्मत केली आणि आपल्या म्युझिक व्हिडीओ शुटच्या प्रोड्युसर आणि डायरेक्टर यांच्याकडे जाऊन तिने त्या माणसाकडून होणाऱ्या त्रासाबद्दल तक्रार केली.

सनीने प्रोड्युसर आणि डायरेक्टरला जाऊन विचारले की तुम्ही माझ्याबरोबर या शूटसाठी मुख्य कलाकार म्हणून अग्रीमेंट सही केला आहात. तुमच्या टीम मधला हा माणूस मला नेहमी त्रास देत आहे. जर तुम्हाला हे शूट पूर्ण करायचे असेल तर त्या माणसाला माझ्यापासून दूर ठेवा नाहीतर मी काम करणार नाही, अशी सक्त ताकीद सनीने त्या दोघांना दिली.  सनी या घटनेबद्दल बोलत असताना अनेक महिलांना सांगू इच्छीते की, “प्रत्येक महिलेला अशा प्रसंगाबद्दल स्वतः आवाज उठवला पाहिजे. अशा परिस्थितीत गप्पबसून चालणार नाही, त्यामुळे तुम्ही उठा आणि अशा घटनेबद्दल आवाज उठवा.”