बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता जी मागच्या काही दिवसांपासून नाना पाटेकर यांच्यावर सेक्स्युअल हराशमेंट चे आरोप करीत आहे. शनिवारी अखेर तिने पोलीस स्टेशन मध्ये नाना पाटेकर आणि कोरिओग्राफर गणेश आचार्य यांच्या विरोधात कायदेशीर गुन्हा दाखल केला आहे.

या केसशी निगडित असलेले पोलीस अधिकारी ACP मनोज कुमार शर्मा यांच्या म्हणण्यानुसार तनुश्रीने त्या दोघांच्या विरोधात कम्पलेंट दाखल केली आहे, परंतु अजून ‘FIR’ मात्र रजिस्टर झालेली नाही.

तनुश्री च्या मते 2008 मध्ये ‘Horn Ok Please’ या चित्रपटाच्या दरम्यान सेट वर नानांनी तनुश्रीस सेक्स्यूअली हरॅश केलं होतं. याविरोधात तनुश्रीने आवाज उठवला तेंव्हा तिच्या मदतीसाठी कोणीही आलं नाही. कारण मोठ्या हस्तींच्या विरोधात सहसा कोणी आवाज उचलत नाही.

या केस बद्दल नाना पाटेकर यांचं मत :-

या विषयावर बोलताना नाना म्हणाले कि, ” मला या विषयावर जे काही बोलायचं होत ते मी दहा वर्षापूर्वीच बोललो आहे. हे सर्व साफ खोटं आहे. तनुश्रीच्या आरोपात काहीच तथ्य नाही, ती मनाला येईल ते बोलत आहे. ती जे काही बोलत आहे ते सर्व साफ खोटे आहे. ” तनुश्रीने आपली बदनामी केल्याबद्दल नानांनी तिला कायदेशीर नोटीसही पाठवली आहे आणि आपली माफी मागावी अशी अपिलही त्यांनी केली आहे.

या केस बद्दल गणेश आचार्य यांचं मत :-

तनुश्रीने ‘Horn Ok Please’ च्या कोरिओग्राफर गणेश आचार्य यांच्यावर सुद्धा आरोप केले आहेत. परंतु गणेश आचार्य यांनी ही बातमी साफ खोटी आहे असे सांगितले आहे, तनुश्री म्हणत आहे तशी घटना घडलीच नाही असे म्हणत गणेश आचार्य यांनी तिचे आरोप नाकारले आहेत. नानाबद्दल बोलताना ते म्हणाले कि नाना सारखा सज्जन माणूस कोणासोबतही असे कधीही वागणार नाही. गणेशजींच्या मते तनुश्री ही पूर्वीपासूनच सेटवरील आपल्या खराब वागणुकीसाठी प्रसिद्ध आहे.

हा एकमेकांवरचा आरोप-प्रत्यारोप तर असंच चालू असणार आहे. जोपर्यंत या केस मध्ये जो खरा आहे त्याला न्याय मिळत नाही, तो पर्यंततरी हे असंच चालू राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here