Whats Is MeToo Movement?

समाजात होत असलेल्या महिलांवरील अत्याचारा विरोधात ही एक मोहीम आहे. ज्याला स्वतः महिलांनी पुढे चालवली आहे. जगभरात या मोहिमेमुळे खळबळ उडाली. महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या, त्यांना त्रास देणाऱ्या आणि त्यांच्या बरोबर गैरवर्तन करणाऱ्या पुरुषांविरोधात चालवलेली ही मुव्हमेंट आहे. यामध्ये महिला आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराबद्दल जगा समोर आपला अनुभव शेअर करतात. आधी ज्या महिला गप्प बसून अत्याचार सहन करायच्या त्या आता गप्प बसणार नाहीत, त्या पुढे येत आहेत आणि न्यायासाठी, समानतेसाठी, हक्कसाठी मागणी करत आहेत.

#MeToo या मूव्हमेंटमुळे आतापर्यंत मोठमोठे दिगग्ज व्यक्तीच्या तुच्छ विचारांचे आणि गैरवर्तनाचे दर्शन संपूर्ण जगाला होत आहे. ऍक्टर, डायरेक्टर, राजकारणी, गायक, पत्रकार, संपादक असे अनेक दिगग्ज लोकांच्या दुष्कृत्याची माहिती जगासमोर येत आहे. #MeToo मूव्हमेंट ही महिला बळकटीकरणाच, महिलांवरील अन्यायच, झालेल्या अत्याचाराच ते प्रतिक आहे.

2017 मध्ये या मूव्हमेंट ची सुरुवात अमेरिकेत झाली. पहिल्यांदा Alyssa Milano हिने #MeToo ट्विट केले होते पुढे ते इतके व्हायरल झाले आहे. खरं पाहता ही मुव्हमेंट दशकापूर्वीच सुरू झाली आहे. परंतु त्याला खरी प्रसिद्धी आता मिळत आहे. Tarana Burke हिने पहिल्यांदा आपल्या मुलाखतीत एका पत्रकाराला आपल्यावर झालेल्या अत्याचारा बद्दल उघड उघड बोलले. तिने म्हटले की 6 वर्षा ची असताना तिच्यावर पहिला बलात्कार झाला आणि तरुण वयात असताना दुसरा बलात्कार झाला. हिच्या नंतर अनेक महिलांनी आपल्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल आवाज उठवायला सुरुवात केली. अशी ही आपल्यासोबत झालेल्या गैरवर्तनाची, बलात्काराची, वाईट अनुभवाची माहिती जगाला दाखवण्यासाठी आणि लोक चेहऱ्यावर किती मुखवटे घालून फिरतात हे दाखवण्यासाठीची ही मूव्हमेंट आहे.

दिवसेंदिवस अनेक लोकांचे नाव समोर येत आहे, अनेकांनी आपल्या ऑफिसमध्ये, आपल्या कॉलनीत, शेजारी, बॅच मधील, कामावरील आशा अनेक महिलांना छळले आहे, त्यांच्यावर बलात्कार केला आहे. आतापर्यंत अमेरिकेत 250 दिगग्ज मोठ्या लोकांचे नाव समोर आले आहे. अमेरिकेत हॉलिवूड, राजकिय नेते, कंपन्यांचे मोठे अधिकारी या सर्वांचे नाव समोर आले आहे. Vox एजन्सी ही अत्याचार करणाऱ्या लोकांची यादी जाहीर करते.

भारतातही #MeToo मूव्हमेंट खूप वेगाने पसरत आहे. अनेक मोठे कलाकार, नेत्यांचे नाव समोर आले आहे. अनेक महिलांनी आपल्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल उघडपणे बोलले आहे. चेतन भगत, अनुराग कश्यप, ह्रितिक रोशन, नाना पाटेकर, गणेश आचार्य, राज्यमंत्री एम जे अकबर, AIB चे सहसंस्थापक आणि CEO तन्मय भट्ट, कॅमेडियन वरून ग्रोव्हर, अलोक नाथ, फिल्म डायरेक्टर विवेक अग्निहोत्री, विकास भहल, ऍक्टर रजत कपुर, उत्सव चक्रवर्ती, गायक कैलाश खैर अशा अनेक बड्या लोकांचे नाव या मूव्हमेंट मध्ये घेण्यात आले आहे. यांनी खरच दुष्कृत्य केलं आहे की नाही हे येत्या काळात कळेलच पण सध्यातरी यांची नावे ही #MeToo मूव्हमेंटमुळे चर्चेत आहेत.

भारतीय महिला ज्यांनी #MeToo मूव्हमेंट मध्ये सहभाग घेतला आहे त्यातील महिलांनी कोनाविरुद्ध ही मोहीम छेडली आहे ते आपण पाहू, सोहा अली खान, तापसी पन्नू, तनुश्री दत्ता- नाना पाटेकर, गणेश आचार्य आणि विकास अग्निहोत्री यांच्याविरुद्ध, प्रिया रामाणी – राज्यमंत्री एम जे अकबर यांच्या विरुद्ध, गुरुसीम्रन खंबा, कंगना राणावत, संध्या मेनन – ए के श्रीनिवासन आणि गौतम अधिकारी यांच्या विरुद्ध, महिमा कुक्रेजा – उत्सव चक्रवर्ती यांच्या विरुद्ध, अनेक महिलांनी संपादक अनुराग वर्मा विरुद्ध, रश्मी सिन्हा – एका डेप्युटी न्युज एडिटर विरुद्ध, तसेच सोनम कपूर अशा अनेक महिलांनी दिग्गजांविरुद्ध #MeToo मूव्हमेंट चालवली आहे.

असा अंदाज वर्तवला जात आहे की एकूण दोन ते अडीच लाख पुरुषांचे नाव त्यांच्या गैरवर्तनामुळे, केलेल्या अत्याचारामुळे, जगासमोर येणार आहे. यावरून हेच दिसतंय की महिलांच्या मनामध्ये जो अत्याचाराबद्दल आणि गैरवर्तनाबद्दल जो राग आहे तो या #MeToo मूव्हमेंट मधून बाहेर पडतोय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here