रोहित शेट्टींचा चित्रपट ‘सिंबा’ हा लवकरच रिलीज केला जाईल. त्या चित्रपटातील काही गाणे रिलीज करण्यात आले आहेत. त्यापैकी ‘आंख मारे’ हे गाणं नुकतंच रिलीज झालं आहे. या गाण्यात गोलमाल ची टीम डान्स करताना दिसली. अजय देवगन सोडला तर बाकी सर्व जण त्या गाण्यात डान्स करताना दिसते. गोलमाल ची टीम त्या गाण्यात डान्स करत आहे, हा इशारा नाहीये. तर डान्स करत असताना त्यांनी एक स्टेप केला तो सर्वांसाठी एकच आणि एकच वेळी होता. त्या स्टेप मध्ये सर्व जण आपल्या हाताची पाच मोठे दाखवून पाच असा इशारा करतात, म्हणजेच हा गोलमाल-5 साठीचाच इशारा आहे.

 

‘सिंबा’ आणि ‘गोलमाल’ ची सिरीज हे सर्व रोहित शेट्टींचेच चित्रपट. त्यामुळे सिंबा चित्रपटाच्या गाण्यात गोलमाल ची टीम दाखवणे आणि त्याच प्रोमोशन करणे हे रोहित शेट्टींच्या हातात आहे. या गाण्यात अर्षद वारसी, कुणाल खेमु, तुषार कपूर बरोबरच मराठमोळा श्रेयस तळपदे हा ही होता. सर्व जण हॅट समोर करून पाच असा इशारा करणारे स्टेप्स करत होते. गोलमाल-4 च्या प्रोमोशन च्या वेळी सुद्धा संपूर्ण गोलमाल टीमने हाताची चार बोटे दाखवून ‘गोलमाल-4’ चा इशारा दिला होता.

 

यावरून हे लक्षात येते की रोहित शेट्टी आपली सिंबा ची शूटिंग किंवा काम संपले की लगेच गोलमाल-5 च्या कामाला लागणार असल्याच्या दाट शक्यता आहेत. लोकांनी सुद्धा गोलमाल सारख्या चित्रपटांच्या सिरीजला खूपच पसंती दिली आहे. त्यामुळे गोलमाल च्या सिरीज मधील पुढचा चित्रपट रोहित शेट्टी काढणार याची जास्त शक्यता आहे. याआधी रोहित शेट्टी आणि गोलमाल टीमने सुद्धा गोलमाल-5 चा इशारा दिला होता.

 

गोलमाल ही रोहित शेट्टींच्या सगळ्यात यशस्वी चित्रपटांची सिरीज आहे. गोलमालच्या चौथ्या पार्ट ने सुद्धा बॉक्स ऑफिस मध्ये 200 कोटीं पेक्षा जास्त कमावले होते. हा चित्रपट ही ब्लॉगबस्टर राहिला होता. त्यावेळी अजय देवगन आणि रोहित शेट्टींनी म्हटले होते की, लोक जो पर्यंत हा चित्रपट बघू इच्छिणार आहेत तो पर्यंत आम्ही गोलमालची सिरीज बनवत राहू, पण सध्या तरी गोलमाल-5 फिक्स आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here