साधारणतः एक वर्षांपासून चर्चेत असलेला रजनीकांत यांचा 2.O या चित्रपटाने आता जवळपास सर्वच चित्रपट गृहात दस्तक दिला आहे. या चित्रपटात अक्षय कुमार खलनायकाची भूमिका पार पाडत आहे. हा चित्रपट, अक्षय कुमारने सायन्स फिक्शन आणि सामाजिक प्रबोधन करणारं चित्रपट असल्याचं सांगितलं आहे. उर्मिला कोरी यांच्या सोबत अक्षय कुमारची ही मुलाखत होती. त्यातील काही प्रमुख गोष्टी खालील प्रमाणे –

2.O मध्ये तुमचा मेकअप खूपच चर्चेत आहे, त्याबद्दल आम्हाला थोडस सांगा.

पूर्ण प्रोसेससाठी जवळपास साडे तीन तास लागायचे. माझ्यावर 3 – 4 व्यक्ती एकाच वेळेस काम करायचे. माझ्यावर थर्ड डिग्री मेकअप केला जात होता. कोणत्याही व्यक्तीवर केला जाणारा हा मेकअप सर्वात हार्ड मेकअप आहे. याला थर्ड डिग्री मेकअप यासाठी म्हणतात कारण शूटिंग दरम्यान जो घाम मला येतो तो बाहेर येत नाही. त्या कॉस्च्युम मधेच घाम राहतो. शूटिंग झाल्यानंतर जेंव्हा माझा मेकअप उतरवला जायचा तेंव्हा माझ्या घामामुळे माझ्या शरीराची खूप दुर्गंधी पसरायची.

तुम्ही जो पर्यंत त्या कॉस्च्युम मध्ये आहेत तोपर्यंत तुम्ही काहीच खाऊ शकत नाही. त्या कॉस्च्युम मध्ये थोडाही बदल होणे शक्य नव्हते. त्यामुळे पूर्णवेळ मी लिक्विड अन्नावर आधारित होतो. एका पिंजऱ्यात असल्याप्रमाणे मी ही त्या कॉस्च्युम मध्ये कैद होतो. कॅमेरा जेंव्हा शिफ्ट व्हायचा तेंव्हा मलाही त्या कॅमेऱ्याकडे शिफ्ट केलं जायचं, कारण तो कॉस्च्युम घालून मी चालू शकत नव्हतो. मला वाटत होते की मी एक खरा पक्षी आहे, कारण काम चालू असताना मला त्या पिंजऱ्यातुन काढायचे आणि काम संपले की परत त्या पिंजऱ्यात टाकायचे. 7 दिवस मी त्या मेकअप सोबत काम केले आहे. मलाच माहीत आहे की माझे ते 7 दिवस कसे गेले आहेत आणि मी कसे काम केले आहे. मी खूपच धाडसी व्यक्ती आहे.

हा मेकअप शरीरासाठी हानिकारक होता का ?

यावर अक्षय कुमारने सांगितले की, कदापि नाही. हा मेकअप शरीरासाठी काहीच हानिकारक नव्हता. फक्त मेकअपसाठी जी प्रोसेस होती, त्यामुळे व्यक्ती थोडा चिडचिडा व्हायचा, एवढंच काय ते. बाकी काहीच हानि नव्हती. तसं तर, मी माझ्या हेल्थ विषयी रिस्क कधी घेत नाही. मला वाटते की हेल्थ आहे तर बाकी सर्व आहे, हेल्थ नाही तर काही नाही. हेल्थ आहे तर करिअर आहे. हेच कारण आहे की मी माझ्या पात्रासाठी कधी 15 किलो वजन कमी किंवा जास्त वाढवू शकत नाही. चेन्नई मध्ये माझी खूप काळजी घेतली जात होती. स्पॉटबॉय पासून कॅमेरामन पर्यंत सर्व जण माझी काळजी घेत होते.

निर्देशक शंकर सोबतचा अनुभव कसा होता ?

मला खूप मजा आली. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. ते निर्देशक नाहीत तर ते एक वैज्ञानिक आहेत. सायन्स बद्दल संपूर्ण चित्रपट ते बनवतात. त्याबद्दल आधीच संपूर्ण रिसर्च ते करतात. मी एक गोष्ट सांगू इच्छितो की हा चित्रपट सोशल आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here