भारतातील टॉप डिश प्रोव्हायडर पैकी चौथ्या क्रमांकास असलेली कंपनी ‘टाटा स्काय’ यांनी आपल्या चॅनेल्स च्या लिस्ट मधून तब्ब्ल २२ चॅनेल्स वगळले आहेत. टाटा स्काय हा ‘टाटा ग्रुप आणि 20th सेंचुरी फॉक्स’ यांचा संयुक्त उपक्रम आहे जो कि आज भारतातील सर्वोच्च डीटीएच ब्रँड्सपैकी एक बनला आहे.

सोनी नेटवर्कच्या २२ चॅनेल्सना टाटा स्काय कडून एक ठराविक रक्कम पाहिजे होती, परंतु टाटा स्काय ने ती रक्कम जास्त असल्या कारणाने रक्कम देण्यास नकार दिला.

TRAI च्या म्हणण्यानुसार, टाटा स्कायने स्वतःहून बंद करण्यात आलेल्या या 22 चॅनल्स व्यतिरिक्त आणखी 11 सोनी नेटवर्क चॅनल्सची ग्राहकांना ओळख करून दिली होती. परंतु या 11 चॅनल्सच्या ऍक्टिव्हेशन साठी ग्राहकांना स्क्रीनवर दिलेल्या नंबर वर मिस्ड कॉल द्यावा लागणार होता. या ऍक्टिव्हेशन च्या आधारावर टाटा स्काय चॅनल्स ब्रॉडकास्ट करणाऱ्यांना पेमेंट करणार होते.

“ब्रॉडकास्टरसोबतच्या व्यवसायिक मतभेदांमुळे आम्हाला आमचे दर वाढवावे लागले, आणि त्यामुळेच आम्हाला काही लोकप्रिय चॅनल्स चालू ठेवून बाकी चॅनल्स बंद करावे लागले आहे.” असे टाटा स्कायचे CEO आणि MD हरित नागपाल यांनी म्हटले आहे.

आम्हाला करारानुसार 11 चॅनल्सना दिल्या जाणाऱ्या दराच्या 3 पट जास्त किंमत मोजावी लागत आहे. ग्राहकांनी अगोदरच SET, Sony sab, Aaj Tak, Sony Six हे चॅनेल्स subscribe केले असतील तर त्यांना फक्त TV स्क्रिन वरील फोन नंबर वर मिस्ड कॉल करायचा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here