अभिनेता राजपाल यादवला दिल्ली उच्च न्यायालयाने 3 महिन्यांच्या सक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे. राजपाल यादवणे 5 कोटी रुपयांचे लोन/कर्ज न फेडल्यामुळे दिल्ली उच्च न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे राजपाल यादव सध्या पोलीसांच्या ताब्यात आहेत.

राजपाल यादव आणि त्यांची पत्नी राधाने वर्ष 2010 मध्ये आपल्या चित्रपट ‘अता पता लापता’ च्या शूटिंग साठी हे कर्ज घेतले होते. तुम्हाला माहीत नसेल याच केस मध्ये मागच्या काही दिवसांपूर्वी कडकडडुंमा कोर्टने राजपाल यादवला 1.60 कोटी रुपये प्रति केस दंड आणि 6 महिन्यांची शिक्षा सुनावली होती. तसेच कोर्टाने राजपाल यादवची पत्नी राधा हिच्यावरही प्रति केस 10 लाख रुपये दंड सुनावला होता. दोघांनाही सात वेळेस चेक बाऊन्स झाल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे दोघांचा मिळून एकूण 11.20 कोटी रुपये दंड भरावा लागेल. असे असून देखील शिक्षा झाल्यानंतर दोघांनाही ताबडताेब जामीन मिळाली आहे.

राजपाल यादवणे 2010 मध्ये ‘अता पता लापता‘ या चित्रपटासाठी कर्ज घेतले होते. त्यानंतर कर्ज चुकतं करताना राजपाल यादवने जे चेक दिले ते सर्व चेक बाऊन्स झाले. त्यामुळे हे प्रकरण कोर्टात गेलं. कोर्टात गेल्यानंतर कोर्टाने राजपाल यादवला दोषी करार देत, शिक्षा ही सुनावली. त्यावेळी राजपाल यादव 3 ते 6 डिसेंबर, 2013 म्हणजे 4 दिवस जेल मध्ये होते.
त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने त्यांच्या अपिलमुळे त्यांची शिक्षा निलंबित केली. राजपाल यादव हे सुप्रसिद्ध काॅमेडियन आहेत. त्यांनी भुलभुलैया, चुपके चुपके सारख्या चित्रपटातून आपल्या कलेचे दर्शन पेक्षकांना दिले आहेत. 47 वर्षीय राजपाल यादव यांचा उत्तर प्रदेशातील शहाजहांपुर येथे जन्म झाला. त्यांनी 1999 मध्ये ‘दिल क्या करे’ चित्रपटातून बॉलीवूड मध्ये प्रवेश केला. राजपाल यादव हे दिल्लीतील नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा येथून पास आऊट आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here