इ.स. 2000 साली छोट्या पडद्यावर प्रचंड गाजलेली मालिका ‘कहाणी घर घर की’ मधून प्रसिद्धीस आलेली आणि नुकतेच आमिर खान यांच्यासोबत ‘दंगल’ या चित्रपटामध्ये काम केलेली लोकप्रिय अभिनेत्री साक्षी तन्वर यांनी नुकतंच काही दिवसांपूर्वी एक मूल दत्तक घेतल आहे.

“दत्तक घेतलेलं मुल हे मुलगी असून तिचं नाव ‘दित्या‘ असं ठेवण्यात आलं आहे. दित्या हे एका देवीचे नाव आहे, आणि माझे आईवडील आणि मित्र मैत्रिणींच्या सपोर्टमुळे मी हे मुल दत्तक घेऊ शकले आहे.” असं साक्षी तन्वर यांचे म्हणणे आहे.

अभिनेत्री साक्षी तन्वर सध्या 45 वर्षांच्या आहेत. रविना टंडन, सनी लिओनी, निलिमा कोठारी यांच्या सोबतच ‘साक्षी तन्वर’ यांचे सुद्धा नाव आता बॉलीवूड मधील मुलांना दत्तक घेणाऱ्या कलाकारांमध्ये घेतले जाईल. इतर कलाकारांनी लग्न झाल्यानंतर बाळास दत्तक घेतले आहेत परंतु सुष्मिता सेन या 2 मुलींना दत्तक घेणाऱ्या सिंगल मदर आहेत.

साक्षी च्या आनंदाच्या क्षणी ‘एकता कपूर’ यांनी आपल्या इंस्टाग्राम वरून साक्षी सोबतचा एक फोटो शेअर केला आणि साक्षी आणि दित्यासाठी एक सुंदर मॅसेज सुद्धा लिहिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here