बहुचर्चित चित्रपट ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ आता लवकरच रिलीज केला जाईल. अनेक जण या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत बसले आहेत. या चित्रपटाच्या प्रोड्यकशन डिझाईनरने हा चित्रपट इतर कोणत्याही हॉलिवूड चित्रपटाचा रेफरन्स घेऊन तयार केला गेला नाही, असं स्पष्ट सांगितले.

चित्रपटाचे प्रोड्यकशन डिझाईनर सुमित बसू म्हणाले,” इतर कोणत्याही हॉलिवूड चित्रपटापासून रेफरन्स घेण्याच आमच्या डोक्यात कधीच आलं नाही. आमचं जीवन हे खूप साधं आहे, आम्हाला वेळ माहीत होती, जहाज आम्हाला माहीत होते. मी Andalusia बद्दल बोलतोय. आम्हाला ते जहाज कसे होते ते माहीत आहे, लोकांना माहीत होते की त्या जहाजांचे डुप्लिकेट जहाज सध्या सुद्धा पाण्यात तरंगत आहेत. त्यामुळे दुसऱ्या कोणत्या चित्रपटापासून आम्हाला कसलाही रेफरन्स घ्यायची गरज नव्हती आणि आम्ही घेतली ही नाही.

परंतु ट्विटर मात्र त्यावर विश्वास ठेवत नाही. आमिर खानला या चित्रपटाबद्दल विचारले असता तो म्हणाला,” मला आशा आहे की माझा ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ मधला रोल बघून लोक जॅक स्परोला विसरतील.”

जॅक स्परो आणि मल्लाह दोघेही आश्चर्यकारकरीत्या सारखेच पात्र आहेत. कारण दोघेही खोडकर आणि नॉटी आहेत. माझी वयक्तिकरीत्या अशी भावना आहे की फिरंगी मल्लाहचा किरदार पाहून लोक जॅक स्परोला नक्कीच विसरतील. परंतु मला हे ही सांगायचे आहे की, व्हिक्टरने लिहिताना जॅक स्परोवर आधारित माझा रोल लिहिला आहे, असं मला अजिबात वाटत नाही. आमिर खानने म्हटले आहे की, हा त्याचा आतापर्यंतचा सर्वात अवघड रोल होता.

ठग्ज ऑफ हिंदोस्तान हा चित्रपट उद्या म्हणजे 8 नोव्हेंबर रोजी रिलीज करण्यात येणार आहे. सर्वांनाच उद्या त्यांच्या प्रतिक्षेला पूर्णविराम मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here