बिग बॉस हिंदीच्या १२ व्या पर्वाला लवकरच सुरुवात होणार आहे, जसजशी बिग बॉस प्रीमिअर ची तारीख जवळ येत तसतशी प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहचत आहे, आणि त्याचे कारणही तसेच आहे. ‘बिग बॉस’ चे १२ वे पर्व हे खूपच वेगळ्या थिम वर असणार आहे. बिग बॉस कडून मिळालेल्या वृत्तानुसार या वर्षी खेळाडू निवडण्याची संधी बिगबॉसनी प्रेक्षकांना दिली आहे.

Voot च्या अधिकृत फेसबुक पेज वर याची माहिती देण्यात अली आहे, १२ व्या पर्वामध्ये निवडक सदस्याबरोबरच काही राखीव सदस्य सुद्धा ‘बिग बॉस’ च्या आऊट हाऊस मध्ये ठेवण्यात येतील. या सदस्यांची निवड प्रकिया ही पूर्णपणे प्रेक्षकांच्या हातात असेल.

खरेतर हा एक टास्क असेल ज्याचे नाव ‘आऊट हाऊस ताला खोल‘ असे असेल. या मध्ये काही निवडक सदस्य हे ‘बिग बॉस’ च्या आऊट हाऊस मध्ये असतील, या सदस्यांमध्ये एक टास्क होईल. त्या टास्कच्या आधारावर प्रेक्षकांना आपले मत द्यायचे आहे. voot च्या माध्यमाद्यांतून प्रेक्षकांना आपल्या आवडत्या सदस्यांना मत देता येईल.

हि संपूर्ण निवड प्रक्रिया १५ सप्टेंबर ला दुपारी १ वाजल्यापासून Voot App वर प्रेक्षकांना लाइव्ह पाहता येईल. ज्या सदस्यांना भरपूर मत मिळतील त्यांना ‘बिग बॉसच्या १२ व्या पर्वा मध्ये एन्ट्री मिळेल. शोमध्ये तडका आणण्यासाठी मेकर्स नि हा नवीन प्रयोग करण्याचे ठरवले आहे. तर मग तयार व्हा आपला आवडता सदस्य निवडण्यासाठी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here