अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा हे दोघेही सध्या नेटफ्लिक्ससाठीच्या निर्मिती संस्थेच्या कामात व्यग्र आहेत. हॉलिवूडमधील सुत्रांचा हवाला देत ‘डीएनए’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार सामाजिक कार्यकर्ती आणि फिल्ममेकर प्रिया स्वामीनाथन हिची बराक ओबामा आणि मिशेल ओबामाने निवड केली आहे.

एका मोठ्या आणि महत्त्वकांक्षी प्रोजेक्टवर ती काम करणार असल्याचं कळत आहे. यापूर्वी तिने २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वेरी यंग गर्ल्स’ची निर्मिती केली असून त्यांच्या सह दिग्दर्शकाचा पण जिम्मेदारी सांभाळली होती. न्यूयॉर्कमधील होत असलेल्या लहान मुलींवरचा लैगिंग अत्याचारावर आधारित ‘वेरी यंग गर्ल्स’ होती. अन्नपूर्णा पिक्चर्स आणि डिकहाऊस प्रोडक्शनसाठीही काम केले आहे.

गुप्तपणे चित्रपट निर्माते, दिग्दर्शकांना वाव देण्यासाठी म्हणून राबवण्यात आलेल्या ‘सनडान्स इन्स्टिट्यूट’च्या ‘फिल्म टु’ या उपक्रमातही ती सहभागी होती.त्यासोबतच लैंगिक अत्याच्यारांविरोधात आवाज उठवणाऱ्या ‘टाइम्स अप’ या चळवळीचाही ती भाग होती. त्यामुळे आता चित्रपट आणि काही अफलातून सीरिजसाठी ओळखल्या जाणाऱ्या नेटफ्लिक्सवर बराक व मिशेल ओबामा आणि प्रियाची ही नवी इनिंग कशी असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.मुख्य म्हणजे बराक व मिशेल ओबामाचं सामाजिक कामांमध्ये असणारं योगदान आणि त्याच मार्गाने त्यांनी उचललेली काही पावलं याकडे पाहता, आता नेटफ्लिक्सवर त्यांच्या निर्मिती संस्थेकडून साकारण्यात येणाऱ्या कलाकृतीवरही त्याचं प्रतिबिंब पडणार ही बाब नाकारता येत नाही.