काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदा जाहिरातीच्या माध्यमातून अभिनयात पदार्पण केल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर आता बिग बींचा नातू अगस्त्य नंदा बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. अगस्त्य हा श्वेता नंदा बच्चन हिचा मुलगा आहे.

अमिताभ यांची नात आणि अगस्त्यची बहीण नव्या नवेली नंदा हिच्या बॉलिवूड पदार्पणाचीही चर्चा काही दिवसांपूर्वी झाली होती. पण नव्या सध्या तिच्या उच्च शिक्षणात व्यस्त आहे. अगस्त्यने मात्र बॉलिवूड पदार्पणाची तयारी सुरू केली असून बिग बींचा त्याला पाठींबा आहे. पण त्याला अभिनयात रुची नसून दिग्दर्शन क्षेत्राची आवड आहे.

View this post on Instagram

We go together like stripes and spots. Gus ♥️

A post shared by S (@shwetabachchan) on

View this post on Instagram

Look at me. I’m the captain now!! Congratulations son xo

A post shared by S (@shwetabachchan) on

दिग्दर्शक होण्याच्या स्वप्नाबाबत अगस्त्यने आजोबांना सांगितलं असून तो दिग्दर्शनाचे धडेसुद्धा गिरवत आहे. अलीकडे त्याने एका शॉर्ट फिल्मच दिग्दर्शन केलं असून त्याची कथा त्यानेच लिहिली होती. त्यामुळे आता बिग बी आपल्या नातवाला इंडस्ट्रीत कशाप्रकारे लॉन्च करतात हे पाहणं अधिक महत्त्वाचं ठरणार आहे.