रिऍलिटी शो मध्ये सर्वात प्रसिद्ध शो म्हणजेच बिग बॉस. २०१८ मधील शो सुरु होण्यास फक्त थोडे दिवस शिल्लक राहिलेत आणि एवढ्या काळात शो मधील स्पर्धकांची नावे सुद्धा फिक्स झाली असतील, अर्थातच. शो मधील स्पर्धकांनी डील देखील साइन केली असणार आणि उर्वरित स्पर्धक हे येणाऱ्या काही दिवसामध्ये डील साइन करतीलच. प्रत्येक वेळी हा शो काहीतरी बदल करीत असतात यावेळी मात्र त्यांनी शो मध्ये जोडी ने एंट्री बंधनकारक केली आहे. परवाच गोव्यामध्ये झालेल्या इव्हेन्ट लाँच शो मध्ये सलमान खानने त्याच्या शो मधील पहिल्या जोडी चे नाव घोषित केले आहे, आणि ती जोडी म्हणजेच कॉमेडियन भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया. या जोडी च्या पाठोपाठ असे काही कलाकार आहेत त्यांची नावे कदाचित या शो मध्ये येणार असल्याची बातमी पसरत आहे. त्यापैकीच काही संभाव्य स्पर्धकांची नावे आपण जाणून घेऊया.

१. भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया :-

कॉमेडी क्वीन म्हणून ओळखली जाणारी भारती सिंग सध्या एका पाठोपाठ एक शो साइन करत आहे. तिने आत्ताच ‘डान्स दिवाने’ हा शो होस्ट केला आहे. आणि खूप दिवसाच्या सुट्टी नंतर तिने परत आपले काम सुरु केले आहेत. आता तिचे आणि तिच्या नवऱ्याचे नाव (हर्ष लिंबाचिया) बिग बॉस या रिऍलिटी शो मध्ये जाहिर झाले आहे. हि जोडी यावर्षीच्या शो मधील पहिली जोडी आहे. भारती आणि हर्ष यांचे एकत्र बजेट हे जवळपास ५० लाख इतके आहे, त्यापैकी भारती ला ३५ लाख आणि हर्ष ला १५ लाख असे बजेट असणार आहे.

२. टीना दत्त :-

कलर्स TV वरील प्रसिद्ध ‘उतरण’ या मलिकतेतील ‘टीना दत्त’ सुद्धा बिग बॉस मध्ये येण्याची शक्यता आहे. छोट्या पडद्यावरील मालिकांसह मोठ्या पडद्यावरील चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. टीना ने चोखेर बाली आणि परिणीता यासारख्या चित्रपटामध्ये काम केले आहे.

३. तनुश्री आणि इशिता :-

जर सर्व ठरल्याप्रमाणे झाले तर दत्त बहिणी सुद्धा लवकरच बिग बॉस साठी जोडी म्हणून निवडण्याची शक्यता आहे. तनुश्री दत्त हि जवळपास ८ वर्षांपासून मनोरंजन क्षेत्रापासून वंचित आहे आणि इशिता सध्या बॉलीवूड मध्ये दिसून येते, तिने तिच्या करियरची सुरुवात ‘दृश्यम’ या चित्रपटामधून केले आहे. अशा या दोघी बहिणी बिग बॉस मध्ये येण्याची शक्यता आहे.

४. श्रीशांत :-

खतरो के खिलाडी आणि अक्सर २ मधून आपल्या एंटरटेनमेंट क्षेत्रातील करियरची सुरुवात केली आहे. श्रीसंथ आता बिग बॉस मध्ये झळकणार असल्याची माहिती बाहेर आली आहे.

५. दीपिका कक्कर :-

ससुराल सिमर का मधील दीपिका ककड हि या शो मध्ये सोलो येणायची शक्यता आहे, कारण तिच्या नवऱ्याने (शोएब इब्राहिम) बिग बॉस मध्ये येण्यास नकार दिला आहे. तिच्या नवऱ्याच्या ऐवजी तिची आई या शो मध्ये येण्याची शक्यता होती पण ते होऊ शकले नाही.

६. करणवीर बोहरा :-

करणवीर बोहरा ज्याने नुकतेच ‘नागीण २’ मधील किरादाराद्वारे आपले वर्चस्व गाजवले आहे त्याने सुरुवातीस बिग बॉस मध्ये नकार दिला होता, परंतु आता बातमी अशी आहे कि कदाचित तो त्याची पत्नी तिजय सोबत येण्याची शक्यता आहे.

७. डँनी डी आणि महिका शर्मा :-

ब्रिटिश पॉर्नस्टार डँनी डी आणि भारतीय कलाकार महिका शर्मा हे दोघे येणार आहेत अशी बातमी आहे. ब्रिटिश पॉर्नस्टार डँनी जे कि त्याच्या त्याच्या कामासाठी खूप प्रसिद्ध आहेत, आणि महिका शर्मा जीने डँनी साठी टॉपलेस फोटोशूट केला होता. डँनी ने बिग बॉस मध्ये येण्याकरिता महिका सुद्धा यायला हवी अशी आत ठेवली होती आणि आता हे दोघे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर मधून शो मध्ये येणार आहेत.

८. स्कार्लेट एम. रोज :-

स्प्लिट्सविल्ला मधील सुंदरी स्कार्लेट रोज हि तिच्या मित्रासोबत रॅन पीटरसन याच्या सोबत बिग बॉस मध्ये एंट्री करण्याची शक्यता आहे. स्कार्लेट जर या शो मध्ये आली तर ती आपल्या सुंदरतेच्या सहाय्याने या शो मध्ये धुमाकूळ करू शकते. तिच्या इन्टाग्राम पेज वरील तिच्या पोस्ट्स तिच्या बद्दल बरच काही स्पष्ट करतात.

९. श्रीष्टी रोडे :-

स्टार प्लस वरील इष्कबाज या मालिकेतील अभिनेत्री श्रीष्टी रोडे हि सुद्धा बिग बॉस मध्ये येण्याची शक्यता आहे. श्रीष्टी हि मनीष नागदेव याच्या सोबत शो मध्ये येण्याची शक्यता आहे.

१०. शालीन भनोत :-

TV स्टार दिलजीत सिंगचा पूर्वीचा पती शालीन भनोत हा सुद्धा शक्यता आहे. शालीन जर या शो मध्ये निवडण्यात आला तर तर तो दर आठवड्यास जवळपास ३५ हजार एवढी रक्कम घेईल अशी शक्यता आहे.

११. सुबूही जोशी :-

MTV स्प्लिट्सविल्ला मधील सुंदरी सुबूही जोशी हि तिच्या बॉयफ्रेंड सिद्धार्थ सागर सोबत बिग बॉस मध्ये एंट्री करेल अशी शक्यता होती, परंतु नंतर तिच्या बॉयफ्रेंड ने नकार दिल्याने आत ति सोलो येणार असल्याची बातमी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here