बॉलिवूड इंडस्ट्री मधील राजेशाही घराण्याचे वारसदार म्हटलं कि बहुतांश लोकांना फक्त सैफ अली खान आठवतात. एवढ्या मोठ्या अशा बॉलिवूड मध्ये फक्त एकटा सैफच राजेशाही घराण्यातून बॉलिवूड मध्ये आला नसून असे आणखीन काही कलाकार सुद्धा आहेत, परंतु त्यांची माहिती आपल्यापैकी जास्तीत जास्त लोकांना नसते. बॉलिवूड मधील अशीच काही नावे जी त्यांच्या कलेच्या जोरावर नावारूपास आली असून त्यांना त्यांच्या करियरसाठी घराण्याच्या नावाचा उपयोग करायची गरज पडली नाही. असेच काही कलाकार आज आपण पाहणार आहोत.

१. आदिती राव हैदरी :-

‘दिल्ली ६’ या चित्रपटातून बॉलिवूड मध्ये प्रवेश करणारी अभिनेत्री आदिती राव हैदरी हि एक नाही तर दोन राजघराण्यांशी संबंधित आहे. मोहम्मद सालेह अकबर हैदरी आणि रामेश्वर राव हे तेलंगणा मधील वनपर्थी येथील राजा होते. तसेच ते आसाम चे भूतपूर्व गव्हर्नर सुद्धा होते. अभिनेत्री आदिती या राजाची नात आहे.

२. सैफ अली खान :-

बॉलिवूड मध्ये राजेशाही घराण्याची चर्चा झाल्यास सर्वात जास्त पसंदीचे नाव म्हणजे सैफ अली खान आणि सोहा अली खान. खूपदा तर आपण सोहा अली खान ला आपण विसरत असतो. हे दोघे बहीण भाऊ हरियाणाच्या पटौदी घराण्याचे वारसदार आहेत. हरियाणा मधील त्यांचे घर ‘पटौदी पॅलेस’ हे खूप वेळा सिनेमा आणि वेगवेगळ्या शूटिंगसाठी वापरण्यात येत असते.

३. रिया आणि रायमा सेन :-

मूळच्या बंगालच्या असलेल्या या दोघी बहिणी या त्रिपुरा च्या राणी ईला देवी यांच्या नाती आहेत. राणी ईला देवी या जयपूर च्या महाराणी गायत्री देवी यांची बहीण आहे. या दोन्ही राणींचे नाव इतिहासात मानाने घेतले जाते.

४. सोनल चौहान :-

इमरान हाश्मी सोबत गाजलेला चित्रपट जन्नत मधून नावारूपास आलेली अभिनेत्री सोनाल चौहान ही सुद्धा एका राजेशाही कुटुंबाशी निगडित आहे. उत्तरप्रदेश मधील मणिपूर येथील चौहान घराण्यातील सोनल हि बॉलिवूड मध्ये आपल्या कलेच्या आधारावर चित्रपट गाजवू शकली. सोनल चे वडील हे एक पोलीस इन्स्पेकटर होते.

५. अलिसा खान :-

अलिसा खान हिने जरी बॉलिवूड मध्ये आपले करियर घडवले नसले तरी तिच्या पूर्वजांनी त्यांचे नाव लौकिक करून ठेवले आहे. गाझियाबाद चे नवाब मुहम्मद गाझियाउद्दीन खान हे अलिसा चे पूर्वज होते. अलिसा ने २०१७ मध्ये ‘मात्र’ या हिंदी चित्रपटामध्ये काम केले होते.

६. किरण राव :-

बॉलिवूड चे सुपरस्टार आमिर खान यांच्या पत्नी किरण राव यादेखील राजेशाही घराण्याच्या सुपुत्री आहेत. किरण राव या तेलंगणा च्या वनपर्थी घराण्याच्या आहेत. आदिती राव हैदरी आणि किरण राव या चुलत बहिणी आहेत.

  1. ७. सागरिका घाटगे :-

‘चक दे इंडिया’ या चित्रपटामधून आपली वेगळीच ओळख निर्माण करणारी अभिनेत्री सागरिका घाटगे हि सुद्धा घराण्याच्या बाबतीत काही कमी नाही. सागरिका हि छत्रपती शाहू महाराज यांची वंशज आहे. ती विजयसिंह घाटगे यांची मुलगी आहे आणि नुकतेच तिचे लग्न भारतीय क्रिकेटपटू झहीर खान यांच्या सोबत झाले आहे.

८. भाग्यश्री :-

सलमान खान सोबत ‘मैने प्यार किया’ या चित्रपटामध्ये झळकलेली अभिनेत्री भाग्यश्री हि महाराष्ट्रातील सांगलीचे राजे विजयसिंहराव पटवर्धन यांची सुपुत्री आहे. तिचा जन्म सांगली येथे झाला पुढे तिने १९८९ मध्ये सलमान खान सोबत बॉलिवूड मध्ये पदार्पण केले आणि त्यानंतर तिचे चित्रपट येऊ लागले. पुढे तिने हिमालय दासानी यांच्याशी विवाह केला आणि चित्रपटामध्ये काम करणे कमी झाले.

हे आहेत आपल्या बॉलिवूड मधील राजघराण्यातील वंशज, सदस्य जे कि आपल्यापैकी माहिती नव्हते. यापैकी कुठल्याही सदस्याने आपल्या घराण्याच्या नावाचा उपयोग करून बॉलिवूड मध्ये काम केले नाही. जे ते कलाकार हे आपल्या कलेच्या जोरावर प्रगतीपथावर आहेत आणि हि एक चांगली बाब आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here