अलीकडे सलमान खान त्याच्या आगामी चित्रपट ‘भारत’ च्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे. तो दिल्ली मध्ये कॅटरिना कैफ बरोबर शूटिंग करत आहे. या चित्रपटाचं काम पुढच्या वर्षी जानेवारीत संपणार आहे. त्यामुळे सलमान खानला त्याच्या पुढच्या चित्रपटाच काम हाती घेण्यासाठी मोकळीक झाली आहे. या येणाऱ्या चित्रपटाच्या कामाबद्दल एक चांगली बातमी पुढे येत आहे.

एप्रिल मध्ये ‘दबंग – 3’ च्या शूटिंगला सुरुवात केली जाईल. बऱ्याच दिवसांपासून ही बातमी चर्चेत आहे की, सलमान खान अरबाज खानच्या प्रोडक्शन खाली ‘दबंग – 3’ ची शूटिंग करणार आहेत. आधी या चित्रपटाचं काम याच वर्षी सुरू होणार होतं, पण अरबाज खानने सांगितले की चित्रपटाच्या स्क्रिप्टचं काम अजून बाकी असल्यामुळे शूटिंग सुरू करायला उशीर झाला. आता अशी बातमी समोर येत आहे की, येत्या एप्रिल महिन्यात या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. यावेळी सलमान खानचं चुलबुल पांडे हे पात्र रिअल लाईफ स्टोरी वर आधारित असणार आहे.

‘दबंग – 3’ चित्रपटाच्या शूटिंगच काम सातारा जिल्ह्यातल्या वाई तालुक्यात होणार आहे. मागच्या दोन्ही चित्रपटाचं काम तेथेच झालं होतं. तसेच उत्तर प्रदेशातील गाझियाबाद आणि नोएडा येथेही चित्रपटाच्या शूटिंगचं काम होणार आहे. सुत्रांच्या माहिती वरून असं कळतंय की सलमान खान त्याच्या ‘भारत’ या चित्रपटाचं काम संपताच दबंग च्या पोस्ट-प्रोडक्शनच काम हाती घेणार आहेत आणि त्यानंतरच शूटिंगच काम होईल. या चित्रपटाचा प्रोड्युसर कोण असेल याची माहिती अजून समोर आली नाही. सर्वांना प्रोड्युसरचे नाव जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे.

सर्वांना ‘दबंग – 3’ च्या उत्सुकतेची आस लागली आहे. हा चित्रपट ही मागच्या दोन दबंग प्रमाणे खूप चालणार आहे यात काही शंका नाही. सलमान खान आणि त्याच्या टीमला ‘दंबग – 3’ साठी खूप खूप शुभेच्छा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here