हा निव्वळ योगायोग म्हणा किंवा मग नशिबाची खेळी. पण, हे अनोखं कनेक्शन जाणून तुम्हालाही बसेल धक्का !

हिंदी चित्रपटसृष्टीत आतापर्यंत बऱ्याच अभिनेत्रींनी त्यांचं नशीब आजमावून पाहिलं. त्यात काहींच्या वाट्याला यश आलं तर काहींना मात्र अपयशाचा सामना करावा लागला. यशाची ही गणितं अगदी सुरेखपणे हाताळणारी अशीच एक अभिनेत्री म्हणजे दीपिका पादुकोण. सध्याच्या घडीला प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी ही मस्तानी आपल्या अभिनय कारकिर्दीत नवनवीन विक्रम प्रस्थापित करत असतानाच तिच्या यशाचं एक अनोखं समीकरण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

दीपिकाने आतापर्यंत साकारालेल्या बऱ्याच चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी पहिली निवड तिच्या नावाला देण्यात आली नव्हती. आता यात नवं काय, असा प्रश्न तुम्हाला पडण्याआधी इथे लक्ष देण्याची बाब म्हणजे दीपिकाला यशाच्या शिखरावर पोहोचवणाऱ्या मुख्य चित्रपटांसाठी अभिनेत्री ऐश्वर्या राय हीच पहिली निवड होती. काही चित्रपट आपण नाकारल्याचं खुद्द या विश्वसुंदरीने सांगितलं आहे.

‘हॅप्पी न्यू इयर’ या चित्रपटातील ‘मोहिनी’ साकारण्यासाठीसुद्धा ऐश्वर्याला विचारण्यात आलं होतं. पण, काही कारणास्तव तिने हा चित्रपट नाकारल्यामुळे शाहरुखसोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी दीपिकाच्या वाट्याला आली. ऐश्वर्यानेच चित्रपट समीक्षक राजीव मसंदला दिलेल्या मुलाखतीत याविषयीचा खुलासा केला.

इतकंच नव्हे, तर संजय लीला भन्साळींच्या मनात ‘बाजीराव मस्तानी’ हा चित्रपटही २००० सालातच साकारण्याचा मानस होता. सलमान खान आणि ऐश्वर्या यांच्या नावांना त्या चित्रपटातील मुख्य भूमिकांसाठी प्राधान्य देण्यात आलं होतं. पण, त्यावेळी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या ऐश्वर्या आणि सलामानच्या नात्यात दुरावा आला आणि काही काळासाठी या चित्रपटाविषयीचे विचार भन्सांळीनीही दूर सारले. ज्यानंतर त्यांनी अखेर रणवीर सिंग, दीपिका पादुकोण आणि प्रियांका चोप्रा यांची निवड करत हा महत्त्वाकांक्षी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला. मोठी विक्रमी कमाई करणाऱ्या ‘पद्मावत’ या चित्रपटासाठीही पुन्हा भन्साळींनी आपल्याला विचारलं होतं, असं ऐश्वर्यानेच ‘स्पॉटबॉय ई’ला दिलेल्या माहितीत म्हटलं.

ऐश्वर्याने ‘राणी पद्मावती’ साकारण्यास नकार दिला आणि सरतेशेवटी हा चित्रपट पुन्हा दीपिकाच्याच वाट्याला आला. ऐश्वर्याने ‘राणी पद्मावती’ची भूमिका साकारली असती तर तिच्यासाठी खिल्जीच्या भूमिकेत भन्साळींना योग्य असा अभिनेता सापडला नास्ता. मुळात चित्रपटाची स्टारकास्टही तितकीच महत्त्वाची असते. त्यामुळेच इच्छा असूनही पुन्हा भन्साळींसोबत काम करण्याची संधी मिळाली नसल्याचंही तिने स्पष्ट केलं.

View this post on Instagram

sunshine in my turtleneck…😝☀️

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

हा निव्वळ योगायोग म्हणा किंवा मग नशिबाची खेळी. पण, ऐश्वर्याने ज्या चित्रपटांना नाकारलं त्याच चित्रपटांनी दीपिका पादुकोणला स्टार केलं हे नाकारता येणार नाही. कलाविश्वात अशाच गोष्टी अनेकदा चर्चेचा विषय ठरतात.