मागील बारा-तेरा वर्षांपासून पासून अतिशय लोकप्रिय अशा सलमान खानच्या ‘बिग बॉस’ या शो च्या १२व्या सिझनच्या प्रीमियरचे काउन्ट डाउन सुरू झाल आहे. वर्ष जातील तसतसं लोकांची या कार्यक्रमाबद्दल लोकप्रियता वाढतच आहे. या सिझन ला पाहण्यासाठी लोकांमध्ये खूप उत्सुकता आहे.

लोकांकडून बिग बॉस -१२ मध्ये कोण कोण असणार या बद्दल अंदाज बांधले जातायत. या वेळेसच्या बिग बॉस-१२ सिझनचं थीम आहे ‘विचित्र जोडी’. सलमान खान कधी एकदा भाग घेतलेल्या व्यक्तींची नावे जाहीर करतो याकडे लोकांच लक्ष लागलेलं होत आणि आता लोकांची अतुरतेन वाट बघण्याची वेळ संपली आहे कारण नुकतंच सलमान खान कडून पहिल्या सेलेब्रिटी जोडीच नाव घोषित करण्यात आलं आहे.

विचित्र जोडी या थीम वर वेगवेगळे कलागुण असलेल्या जोड्या यात भाग घेणार आहेत. या भागात खऱ्या जोड्या सुद्धा भाग घेण्याची शक्यता आहे. अशाच एका जोडीच सलमान खानने नाव घोषित केलं आहे आणि ती जोडी म्हणजे कॉमेडी क्वीन ‘भारती सिंग’ आणि ‘हर्ष लिंबाचिया’. गोवा येथे झालेल्या प्रेस मीटिंग मध्ये सलमान खानने या जोडीच नाव घोषित केलं आहे.

भारती सिंग सारखी लोकप्रिय सेलेब्रिटी जेंव्हा या सिझन मध्ये भाग घेत आहे त्यामुळे या सिझनच्या लोकप्रियते मध्ये आणखी भर पडणार आहे.

भारती सिंग ला याबद्दल विचारले असता, ती म्हणाली की,

“मी लोकांसाठी क्रोधाची व्यक्ती बनणार नसून, मी मनापासून हा शो जिंकू इच्छित आहे. त्यासाठी मी हार मानणार नाही. जरी माझा जोडीदार हर्ष या शो मधून वगळला गेला तरी मी हार न मानता जिकण्यासाठी प्रयत्न करीत राहीन.”

असं ती म्हणाली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here