Tiger movie imraan

इम्रान हाश्मीचा मोठ्या वादात अडकलेला चित्रपट ‘Tiger‘ अखेर भारतात रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. इम्रान हाश्मी आणि गीतांजली थापा यांचा हा चित्रपट 21 नोव्हेंबर रोजी भारतात तसेच जगभर डिजिटली Zee5 वर रिलीज होणार आहे.

Danis Tanovic हे इम्रान हाश्मीला आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या गीतांजली थापा या ऍक्टरेसला घेऊन मागच्या चार वर्षांपासून या चित्रपटाच्या निर्मितीच काम करत होते. हा चित्रपट अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित करण्यात आला आहे आणि क्रिटिक्स कडून पॉजिटिव्ह रिस्पॉन्स सुद्धा या चित्रपटाला मिळाला आहे. चित्रपटातील बोल्ड विषयामुळे हा चित्रपट भारतात रिलीज होऊ शकला नाही, खरं तर हा चित्रपट खऱ्या घटनेवर आधारित आहेत.

व्यापार मार्गदर्शक Taran Adarsh यांनी पहिल्यांदा या चित्रपटाचं पोस्टर शेअर करत लिहलं आहे की, “Emraan Hashmi… #Tigers will have its world digital premiere on 21 Nov 2018 on ZEE5… Directed by Academy Award winning Danis Tanović… Produced by Cinemorphic and Sikhya Entertainment.” म्हणजे यांच्यावरून हा चित्रपट Cinemorphic आणि Sikhya Entertainment मिळून प्रोड्युस करतायत आणि दिग्दर्शक Danis Tanović आहेत.

https://twitter.com/taran_adarsh/status/1059720405395496962/photo/1

अगोदर, हा चित्रपटाबद्दल बोलताना इम्रान हाश्मी म्हणाला होता की,” आम्ही बर्लिन मध्ये गेलो, टोरंटो येथे गेलो, न्यूयॉर्क येथे सुद्धा गेलो या सर्व ठिकाणी चित्रपट रिलीज करण्यात आला पण भारतात अजूनही हा चित्रपट रिलीज होऊ शकला नव्हता. त्यावेळी प्रोड्युसर्स दरम्यान वाद झाला असल्याने चित्रपट चार वर्षे अगोदर भारतात जेंव्हा रिलीज व्हायला पाहिजे होता त्यावेळी रिलीज होऊ शकला नाही. परंतु आता सर्व प्रॉब्लेम दूर करण्यात आले आहेत. तरीही एक महत्वाचा प्रॉब्लेम आहेच आणि तो म्हणजे भारत-पाकिस्तान वाद. त्यावेळी बोलताना इम्रान हाश्मी म्हणाले होते आताच्या वातावरणात हा चित्रपट आम्ही रिलीज करू शकत नाही.”

या चित्रपटात इम्रान हाश्मी हा सेल्स रेप्रेझेन्टेटिव्ह ची भूमिका साकारत असतो. सेल्स रेप्रेझेन्टेटिव्हचं मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांना महत्त्व पटवून देणारा हा चित्रपट आहे. यात तो कंपनीतील बेबी फूड घोटाळ्याचा पडदा फाश करतो.

तसेच इम्रान हाश्मीने सौमिक सेनच्या ‘Cheat India‘ चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. तो चित्रपट येत्या जानेवारी मध्ये भारतात रिलीज करण्यात येईल. त्याच्या दुसऱ्या येणाऱ्या ‘Father’s Day‘ चित्रपटात तो एक रिअल लाईफ डिटेक्टिव्ह चा रोल साकारत आहे. गुजराती लेखक प्रफुल पटेल यांच्या कादंबरी वर चित्रपट बनवला जात आहे. त्या कादंबरी च नाव ‘दृश्यम अदृश्यम’ आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here