बॉलीवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदा यांच्या सासऱ्यांच निधन झालं आहे. अमिताभ यांनी स्वत: त्यांच्या ट्विट अकाऊंटवर राजन नंदा यांच्या निधनाची माहिती दिली. राजन नंदा यांच्यावर गुरुग्राममधील एका रुग्णालयात उपचार सुरु होते.

रविवारी (५ ऑगस्ट) रुग्णालयातच अखेरचा श्वास घेणारे राजन हे एक नावाजलेले उद्योगपती होते. त्यांनी १९९५ साली एस्कॉर्ट्स लिमिटेडच्या अध्यक्षपदाची जिम्मेदारी त्यांनी सांभाळली आणि हा व्यवसाय एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवला.

राजन नंदा यांच्या निधनानंतर ऋषी कपूर यांची मुलगी रिद्धीमा कपूर साहनी हीनेदेखील इन्स्टाग्रामवर पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली दिली. ‘तुम्ही आमच्यासाठी कायमच एक आदर्श होतो. आज तुमची उणीव जाणवत असून तुम्ही कायमच आमच्या आठवणींमध्ये राहाल’, अशी पोस्ट करत रिद्धीमाने त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

https://www.instagram.com/p/BmGogIRBj8y/?taken-by=riddhimakapoorsahniofficial

राजन नंदा यांच्या निधनाची बातमी मिळताच अमिताभ बच्चन त्यांच्या आगामी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचं चित्रीकरण सोडून भारतामध्ये परतले आहे.