सनी लिओनी ने नाकारली ‘गेम ऑफ थ्रोन्स’ ची ऑफर.?

हॉलिवूड चित्रपट असो किंवा कोणती प्रसिद्ध वेबसेरीज असो त्यात काम करण्याचे प्रत्येक भारतीय कलाकारांची इच्छा असते. मग ती ‘गेम्स ऑफ थ्रोन्स’ असल्यास ती संधी कोणताही कलाकार सोडणार नाही. परंतु, सनी लिओनीच्या बाबतीत मात्र काही वेगळेच दिसतंय.

सध्या सनीच्या जीवनावर आधारित ‘द अनटोल्ड स्टोरी ऑफ करणजीत कौर‘ मुळे ती सध्या बरीच चर्चेत होती. आता पुन्हा एकदा ती नवीन विषयामुळे चर्चेत आली आहे, आणि कारण हि तसे वेगळेच आहे.

सनी नी काही दिवसापूर्वी झालेल्या आपल्या एका मुलाखतीत एक मोठा खुलासा केला कि, वर्ल्डवाईड पॉप्युलर अमेरिकन शो गेम ऑफ थ्रोन्स मध्ये तिला रोल ऑफर करण्यात आला होता. परंतु सनी ने हा रोल करण्यास नकार दिला.

सनी ने या मुलाखतीत सांगितले कि, ‘मला एका व्यक्तीने संपर्क केला आणि त्याने मला सांगितले कि मला माहिती आहे मी तुम्हला शेवटच्या क्षणी विचारतोय. परंतु आम्ही तुम्हाला गेम ऑफ थ्रोन्स मध्ये एका रोल साठी कास्ट करणार आहोत. हि ऑफर ऐकून मी अश्यर्यचकित झाले आणि मला विश्वास बसत नव्हता हे सगळे कसे झाले.’

त्यानंतर हि ऑफर हि खोटी आहे म्हणून समजले कारण या मुलाखततीत ती पुढे म्हणाली, ‘त्यानंतर त्यांनी आपली ओळख सांगण्याकरिता ‘IMBD’ लिंक पाठवली होती, ती लिंक पाहिल्यानंतर असे समजले कि ती एक फेक ऑफर होती.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here