बिग बॉस 12 मधील स्पर्धक भजन गायक अनुप जलोटा आणि जसलीन मथारू यांच्या सबंधामुळे अनेकांच्या भुवया अगोदरच वर चढल्या आहेत. हे दोघेही बिग बॉस 12 मधील पार्टीसिपंट्स आहेत आणि या दोघातील प्रेमसंबंधामुळे खूपच चर्चेत आहेत.

बिग बॉस मधील एका टास्क दरम्यान दीपक, शिवशीष यांना कँप्टन्सी साठी हा टास्क देण्यात आला होता. त्यात बिग बॉस या घरातील एका एका सदस्यांचे सिक्रेट सांगतील आणि या दोघांनी ते कोणाचे सिक्रेट आहे ते ओळखायचे होते. या टास्क मध्ये सिक्रेट असे होते कि, घरातील एका सदस्याचे यापूर्वी एका प्रसिद्ध कलाकाराशी प्रेमसंबंध होते आणि त्याच्या सध्याच्या पार्टनर ला याच्याबद्दल काही कल्पना नाही. या सिक्रेट वर शिवाशिष यांनी जसलीन मथारू यांचे नाव पुढे आणि ते खरे होते.

या सिक्रेट बद्दल बोलताना अनुपजी म्हणाले कि हे तर मला अगोदरच माहिती होते, तर यात कसलं सिक्रेट आहे. अनुपजींना जसलीनच्या जुन्या संबंधाबद्दल माहिती असल्याचं सांगत असताना त्यांनी दोनदा त्यांच्या तोंडून सुखी असा उच्चार केला. त्यावेळी जसलीन अनुपजींना त्याचे नाव घेण्यापासून थांबवत होती. येथे सुखी म्हणजे सुखविंदर सिंघ जे कि एक प्रसिद्ध गायक आहेत. त्यांच्यासोबत जसलीन चे तब्ब्ल 1 वर्ष प्रेमसंबंध होते.

अनुपजी याबाबत आणखी पुढे सांगतात की, म्युझिक इंडस्ट्री च्या लोकांकडून त्यांनी जसलीन आणि सुखविंदर सिंग यांच्या संबंधाबद्दल ऐकलं होतं. कमाल राशीद खान ( KRK) यांनी ट्विट करून हे सांगितलं कि जसलीन गेल्या एक वर्षांपासून सुखविंदर सिंग यांना डेट करत होती आणि या संबंधाबद्दल अनुप जलोटा परिचित आहेत. म्युझिक इंडस्ट्री मध्ये सुखविंदर सिंग यांना प्रेमाने सुखी म्हटलं जायचं.

बिगबॉसच्या २० ऑक्टोबर च्या विकेंड च्या वॉर मध्ये सलमान ने विशेष करून जसलीन साठी सुखविंदर सिंग यांचे फेमस गाणे छय्या छ्य्या डेडिकेट केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here