कंगना राणावतचा आगामी चित्रपट ‘ मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी ‘ या चित्रपटाचे काम सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. या चित्रपटात काम करणाऱ्या कामगारांचा आणि चित्रपट निर्मात्यांमध्ये काही कारणामुळे वाद निर्माण झाला आहे. यावर बोलताना कंगना राणावत कामगारांची बाजू घेत ती म्हणते आधी कामगारांचा प्रश्न सोडवल्याशिवाय मी या चित्रपटाचा प्रचार करणार नाही. चित्रपटाचं काम सध्या पूर्ण झालं असून, या चित्रपटाच्या प्रचाराच्या कामाची तयारी सुरू होती. तेवढ्यात कामगारांचा प्रश्न कंगना राणावत हिच्या लक्षात येताच तिने आपली आशा प्रकारे बाजू मांडली. ती पुढे म्हणते जो पर्यंत त्यांचा प्रश्न सोडवला जात नाही, तो पर्यंत मी प्रचाराचे काम करणार नाही, आशा सडेतोड शब्दात कंगना राणावतने आपले म्हणणे मांडले.
ती म्हणते, फिल्म इंडस्ट्री मध्ये कामगारांना आणि टेक्निशियनांना खूप कमी समजलं जातं त्यांना म्हणावं तशी वागणूक दिली जात नाही. मला आशा प्रकारची वागणूक बिलकुल चालणार नाही. मी या पद्धतीच्या वागणुकीचा नेहमी विरोध करते. मला माहित नाही या अभिनेत्यांना विनाकारण का एवढं डोक्यावर घेतलं जातं आणि कामगारांना आणि ज्युनिअर आर्टिस्टना का कमी समजलं जातं. याच मुळे मला ज्युनिअर आर्टिस्ट व्हायचं आहे.
मी लेखनात आणि निर्देशनात माझा हात बघून पाहणार आहे. जर मी या दोन्ही मध्ये यशस्वी झाले तर पुढे यात उत्तम करिअर मी करेन. कारण चित्रपट उद्योगातील ते गुमनाम नायक असतात. अभिनेत्याने मारलेल्या डायलॉगला सगळेच दाद देतात पण तो डायलॉग कोणी लिहिला हे मात्र कोणाला माहीत नसतं. तसेच त्या सिनच निर्देशन कोणी केलं हे ही कोणाला माहीत नसतं. जर अशी परिस्थिती असेल तर ती खरच खूपच दुःखद असेल. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज यांनी मणिकर्णिका चित्रपटातील कामगारांचे दीड कोटी रुपये बाकी असल्याचं सांगितलं.
शुक्रवारी निर्माता कमल जैन यांनी या आरोपांना साफ फेटाळल. त्यांनी म्हटलं की अशी कोणतीही बाकी शिल्लक राहिलेली नाही, चित्रपट प्रदर्शित करण्या अगोदर सर्व कायदेशीर कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. चित्रपट निर्मात्यांनी कंगना राणावत हिला पूर्णपणे आश्वस्त केलं की, ” संपूर्ण मामला लवकरच सेटल केला जाईल, त्यामुळे तुम्ही निश्चिन्त रहा. आम्ही कोणावरही अन्याय होऊ देणार नाही.” असं निर्माते म्हणाले.
‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ हा चित्रपट 25 जानेवारी रोजी रिलीज करण्यात येईल.