सोनी टेलिव्हिजन वरील सर्वात हिट शो देणारा कॉमेडियन कपिल शर्मा हा त्याच्या शो मधील सहकलाकार ‘सुनील ग्रोव्हर’ सोबत झालेल्या वादामुळे काही महिने इंडस्ट्री पासून दूर झाला होता. सध्या कपिल शर्मा ने आपले वजन कमी केले आहे आणि इंडस्ट्री मध्ये कमबॅक करण्यासाठी तो तयार आहे.

कपिल शर्मा या दिवसांत त्याचा पंजाबी चित्रपट ‘सन ऑफ मनजीत सिंग‘ च्या प्रमोशन मध्ये बिझी आहे. या चित्रपटामध्ये पंजाबी स्टार ‘गुरप्रीत घुग्गी’ हा मुख्य ऍक्टर म्हणून काम करत आहे. या चित्रपटाचे निर्देशन विक्रम ग्रोव्हर यांनी केलं आहे. हा चित्रपट 12 ऑक्टोबर रोजी रिलीज करण्यात येईल. या चित्रपटाचे प्रोड्युसर कपिल शर्मा आणि सुमित सिंह आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here