karan-johar_

करण जोहरने आपल्या Dharma Productions अंतर्गत एक नवीन डिजिटल शाखा सुरू केली आहे. आपल्या ऑनलाईन युजर्ससाठी करण जोहरने हे पाऊल उचललं आहे. Dharma Production च्या मुख्यकार्यकारी अध्यक्षा(CEO) अपूर्वा मेहता आणि करण जोहर या दोघांनी या नवीन ओपनिंग बद्दल सर्वांना माहिती दिली.

त्यांनी पुढे माहिती दिली की, ते चालू करत असलेल्या डिजिटल डिव्हिजन मध्ये Dharma Productions मधील क्रिएटिव्ह डेव्हलपमेंटची हेड Somen Mishra असणार आहेत. त्या या डिव्हिजन मध्ये फिक्शनल कंटेंट सांभाळतील आणि तसेच नॉन- फिक्शनल कंटेंट साठी NDTV च्या माजी पत्रकार Aneesha Baig सांभाळतील.

मागे करण जोहरने Netflix वर चार पार्ट मध्ये Lust Stories नावाने सिरीज ही चालवली होती. यावर्षीच्या सुरुवातीला ही सिरीज रिलीज करण्यात आली होती. Dharma Production चे Amazon Prime Video बरोबर चित्रपटासाठी लॉंगटाईम पार्टनर्शीप करार आहे.

Mint या माध्यमांशी बोलताना करण जोहर म्हणाला, ” आम्ही पुढच्या वर्षी पूर्णपणे डिजिटल जाण्याचा प्लॅन करत आहोत. आम्ही जे काही सिरीज चालू करू त्या सर्व इंटरनेट वर पाहायला मिळतील. ऑनलाईन युजर्सना ही खूप आनंदाची गोष्ट आहे. ही एक खूप मजबूत डिजिटल कंपनी बनणार आहे. आम्हाला एक कंटेंट प्रोव्हायडर आणि क्रिएटर म्हणून काम करायचे आहे. आमच्याकडे आधीच सर्व काही सजोसामान उपलब्ध आहे, त्यामुळे काही महिन्यातच आम्ही उंच टेकऑफ करू.” असं करणं जोहर म्हणाला.

करण जोहर हा सध्या त्याच्या लोकप्रिय शो ‘Koffee with Karan’ च्या कामात व्यस्त आहे. Colors वरील India’s Got Talent मधील जज चे पद सोडून तो सध्या त्याच्या शो मध्ये व्यस्त आहे. तसेच Dharma Production च्या येत असलेल्या पाच चित्रपटांच्या कामातही तो व्यस्त आहे. ते पाच चित्रपट Bramhastra, Kalank, Ranbhoomi, Takht आणि रजनीकांतचा भारतातील सर्वात महागडा चित्रपट 2.O हे आहेत. 2.O च्या हिंदी व्हर्जन चे काम ही Dharma Production करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here