kedarnath movie

केदारनाथ हा चित्रपट 2013 मधील हिमालयातील केदारनाथ दुर्घटनेवर आधारित आहे. काही वरिष्ठ भाजप नेते हा चित्रपट हिंदूच्या भावना दुखावत असल्याचं सांगत, या चित्रपटावर बंदी घालावी अशी मागणी करत आहेत. तसेच हा चित्रपट लव्ह जिहादला बढावा देतो आहे, त्याच्या ट्रेलर मध्ये हेच दिसत आहे, असं सांगून त्याला बॅन करण्याची मागणी करत आहेत. ते भाजप चे वरिष्ठ नेते CBFC च्या चेअरमन कडे जाऊन या Ronnie Screwwala आणि Pragya Kapoor यांच्या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली.

भाजपचे नेते अजेंद्र अजय हे राज्याच्या भाजप च्या मीडिया रिलेशन्स च्या टीमचे पार्ट आहेत, त्यांनी Central Board Of Film Certification च्या चेअरमनला Prasoon Joshi यांना लिहिले की, हा चित्रपट सर्वात वाईट मानवी दुर्घटनेवर आधारित आहे, हा चित्रपट अभिषेक कपुर डायरेक्ट करत आहेत. परंतु ते हिंदू भावना ठेस पोहचवत आहेत. या चित्रपटातील मेन पेअर असलेले सुशांत सिंग रजपूत आणि सारा अली खान यांच्या किसिंग सिनवर प्रश्न उठवत, अजेंद्र अजय यांनी प्रसून जोशींना यावर बॅन करण्याची मागणी केली.

भाजप नेते चित्रपटाचे नाव आणि त्यातील किसिंग सिनला यांच्या मुळे याला विरोध करत असल्याचं सांगितलं. या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये दाखवलेल्या या किसिंग सिनमुळे आणि चित्रपटाच्या पोस्टर वर लिहिलेल्या ‘Love is Pilgrimage’ या टॅगलाईन मुळे भाजप नेते म्हणत आहेत की हा हिंदू धर्मावरील आघात आहे आणि केदारनाथ येथील करोडो लोकांच्या विश्वासावर घाव घालण्यात आलं आहे, अस नेते म्हणतायत. चित्रपट निर्मात्यांनी हिंदू धर्माबद्दल खूप अनादर या चित्रपटमार्फत दर्शवला आहे.

या चित्रपटाला विरोध करताना भाजप नेते म्हणाले, की निर्मात्यांना मुस्लिम पोर्टर आणि हिंदू श्रद्धाळू यांच्यातच का लव्ह दाखवावा वाटला. त्या मुस्लिम मुली ऐवजी हिंदू मुलगी का त्यांनी दाखवली नाही. त्यामुळे त्यांनी हा चित्रपट लव्ह जिहादला बढावा देत असल्याचा आरोप करत त्याला विरोध करत आहेत. यांच्या विरोधामुळे या चित्रपटावर काही परिणाम होतो का नाही हे पाहण्याची आवश्यकता आहे. CBFC यावर काय निर्णय घेते हे ही पाहण्याची आवश्यकता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here