अर्जुन कपूर आणि मलाईका आरोरा मागच्या बऱ्याच दिवसांपासून त्या दोघांतील नात्यांमुळे मिडियातील चर्चेचा विषय बनले आहेत. अजून तरी त्या दोघांनी आपल्या नात्याबद्दल काहीही खुलासा केलेला नाही. मिलान एअरपोर्ट येथून एकमेकांच्या हातात हात घालून बाहेर पडत असतानाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आणि लवकरच ते दोघे आपल्या प्रेमाचा खुलासा करणार असल्याचे समोर येत आहे.

अस म्हटलं जातंय की, मलाईका आणि अर्जुन पुढच्या वर्षी लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. या गोष्टीचा ते लवकरच खुलासा करणार आहेत, आणि सर्वांसमोर जाहीर सुद्धा करतील. नुकतंच हे दोघे अबुधाबी मध्ये एकत्र पहिले गेले आहेत. तेंव्हा पासून ते सोशल मीडियावर खूप ट्रोल होत आहेत. सूत्रांच्या म्हणण्यानुसार त्यांना एकमेकांची एवढी सवय झाली आहे की, ते एकमेकांपासून दूर राहू शकत नाहीयेत.

मलाईका आरोरा सध्या ‘इंडियाज गॉट टॅलेंट‘ या रिऍलिटी शो मध्ये जज ची भूमिका करत असल्याचं आपल्याला दिसत आहे. तिच्या बरोबरच ‘किरण खेर’ आणि ‘करण जोहर’ हे दोघेही जज ची भूमिका करत आहेत. अर्जुन कपूर आणि परिणीती चोपडा हे दोघे आपली फिल्म ‘नमस्ते इंग्लंड’ च्या प्रोमोशन साठी या शो मध्ये नुकतेच आले होते.

या शो मध्ये अर्जुन कपूर आणि मलाईका आरोरा स्टेजवर डान्स करताना दिसले.

त्यांच्या या नात्याबद्दल बोलत असताना मलाईका यांनी ‘DNA’ न्यूज यांना सांगितले कि, “अर्जुन एक चांगला मित्र आहे आणि आमच्या या नात्यास सर्वजण वेगळेच नाव देत आहेत .”

‘मलाईका’ आणि ‘अरबाज खान’ यांचे 1998 मध्ये लग्न झाले होते त्यानंतर त्या दोघांनी 2017 मध्ये डिवोर्स घेतला. या दोघांना अरहाण नावाचा एक मुलगा देखील आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here