या अगोदर रिलीज करण्यात आलेल्या टिझर पोस्टर ने आधीच या चित्रपटा बद्दल महाराष्ट्रात खलबली उडवली आहे. लोकं या चित्रपटासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. सोशल मीडियावर रिलीज केल्यापासून लोकांनी या टिझर पोस्टर ला खूप पसंती दर्शवली आहे. आज, या चित्रपटातील लिडिंग ऍक्टर रितेश देशमुख याने दिवाळीचे औचित्य साधून माऊली चित्रपटाचं औपचारिक पोस्टर रिलीज केलं आहे.

या पोस्टर मध्ये रितेश देशमुख आपल्या समोरच्या प्रतिस्पर्ध्या बरोबर लढाई करताना फायटिंग स्टान्स मध्ये उभा आहे. त्याचं हे पात्र लढाई साठी खूप जाणलं जातं. त्या पोस्टर मध्ये त्याच्या अंगावर एक टि-शर्ट आहे, जी की डॉटेड आहे. यात रितेश देशमुख ला मिशा आहेत, गळयात काळा दोरा बांधलेला आहे. रितेश देशमुखच्या मागे ढगात विठ्ठलाची प्रतिकृती निर्मित झाली आहे. चित्रपटाच्या नावामुळे आणि रिलीज तारखेमुळे हे पोस्टर क्रीएटीव्ह पोस्टर भासत आहे.

रितेश देशमुखने इन्स्टाग्राम वर पोस्ट करत लोकांना या पोस्टर बद्दल माहिती दिली. त्यानं लिहिलंय लक्ष्मीपूजनाच्या या मंगल दिवशी म्हणजेच रितेश च्या भाषेत ‘लय भारी’ दिवशी ‘माऊलीचं‘ पहिलं पोस्टर रिलीज. त्यानंतर तो लिहितो, मी माऊली आणि येतोय माऊली.

या माऊली चित्रपटाला आदित्य सरपोतदार डायरेक्टर म्हणून लाभले आहेत. तेच या चित्रपटाचं डायरेकशन करणार आहेत. तसेच मुंबई फिल्म कंपनी आणि हिंदुस्तान टॉकीज यांच्या संयुक्त विद्यमानाने यांच्याच बॅनर खाली माऊली चित्रपटाचं प्रोड्युकशन केलं जातं आहे. जेनेलिया देशमुख ही या चित्रपटाची प्रोड्युसर आहे. या चित्रपटाला संगीत अजय-अतुल ने दिले आहे.

पोस्टर वरील तारखेनुसार हा चित्रपट 14 डिसेंबर रोजी रिलीज केला जाईल.

माऊली चित्रपटाचा ट्रेलर YouTube वर बघण्यासाठी येथे क्लिक कराhttps://www.youtube.com/watch?v=CAOvTG3DANI

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here