चित्रपट ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ चे निर्माता, निर्देशक आणि ऍक्टर या सर्वांच्या विरोधात जौनपुर येथे विशेष जातींना अपमानीत केल्याबद्दल, त्यांच्या भावनां दुखावल्याबद्दल आणि मानहानी केल्याचा आरोप केला गेला आहे. SAGM 5 कोर्टाने त्यांचा तक्रार पत्र/ निंदलेख दाखल करून घेतला आहे. तक्रार दाखल केलेले अभिवक्ता हंसराज चौधरी याना कोर्टाने 12 नोव्हेंबर रोजी पेशी करीत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. चित्रपटाचं शीर्षक बदलण्यासाठी आणि मल्लाह शब्दपूर्वी वापरलेला फिरंगी शब्द काढून टाकण्यासाठी जिल्हाधिकारीच्या मदतीने राष्ट्रपतींकडे निषाद समाजाच्या लोकांनी 2 दिवसांपूर्वीच याचिका पाठवली आहे.

हंसराज चौधरी या व्यक्तीने चित्रपटाचे निर्माता आदित्य चोपडा, निर्देशक विजय कृष्णा आणि अभिनेता आमीर खान यांच्या विरोधात ही तक्रार केली आहे. हा चित्रपट इंग्रजी कादंबरीकार कडून लिहिली गेलेली कादंबरी आहे, जी की स्वातंत्र्याच्या आधी लिहिली गेली आहे आणि ते लेखक स्वातंत्र्य प्रेमींना आतंकवादी ठग्ज म्हणत होते. 30 ऑक्टोबर रोजी चौधरी शिवाय प्रदीप निषाद, ब्रजेश निषाद, संजीव नागर आणि मनोज नागर यांनी या चित्रपटाचा ट्रेलर पहिला आणि त्यांना आढळून आलं की चित्रपटात मल्लाह जातीला फिरंगी मल्लाह म्हटलं जाऊन अपमानीत केलं गेलं आहे.

तसेच अन्य तक्रारकर्ते हिमांशू श्रीवास्तव आणि ब्रजेश सिंह यांच्या नुसार हे सर्व जाणून बुजून केलं गेलं आहे. चित्रपटाची टीआरपी वाढवण्यासाठी आणि ट्रेलर व्हायरल करण्यासाठी खेळलेली ही चाल आहे. या चित्रपटाला जाणून बुजून विशेष जातीला अपमानीत करणे आणि वादपूर्ण शीर्षक देणे या गोष्टी केल्या आहेत. संपूर्ण निषाद समूहाला या चित्रपटात फिरंगी आणि ठग म्हणून अपमानीत केलं गेलं आहे. चित्रपटात 1795 ची घटना दाखवली गेली आहे. यात एक समूह ब्रिटिश शासनापासून भारताला मुक्त करण्यासाठी लढत आहे. चित्रपटाची कहाणी फक्त कानपूर जिल्ह्यापुरतीच मर्यादित आहे, मग शीर्षक ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ का दिलं आहे, असा प्रश्न तक्रारकर्ते करत आहेत.

आमिर खानला चित्रपटात फिरंगी मल्लाह नावाने संबोधले गेले आहे. चित्रपट निर्माते जाणून आहेत की वाद निर्माण झाला की चित्रपटाची आणखी जास्त प्रसिद्धी होते आणि चित्रपट आणखी जास्त चालतो. जर याला विरोध झाला नाही तर लोक निषाद आणि मल्लाह यांना ठग आणि फिरंगी समजतील. निर्मात्यांच्या या कृत्यामुळे जातीमध्ये घृणा आणि वैमनस्य निर्माण होईल, असा आरोप तक्रारकर्ते करत आहेत. तक्रारकर्त्यांनी या तिघांना दंडीत करून शिक्षा करण्याची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here