वयाच्या ३७व्या वर्षीदेखील धोनी सायकलवर स्टंट करताना दिसत आहे.

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा कायम आपल्या ‘कूल’ अंदाजामुळे चर्चेत असतो. त्यापैकी एक म्हणजे त्याचे निरोगी आणि तंदुरुस्त आरोग्य. वयाच्या ३७व्या वर्षीदेखील खेळपट्टीवर त्याच्याइतका चपळ खेळाडू क्वचितच पाहायला मिळतो. त्यामुळे त्याची नेहमी वाहवा केली जाते.काही वेळा तर धोनी अत्यंत विचित्र पद्धतीचे फटके खेळून प्रतिस्पर्ध्यांना आणि चाहत्यांना थक्क करतो.

धोनीचे क्रिकेटप्रेम तर सर्वांना ज्ञात आहे. त्या बरोबरच फुटबॉल आणि बॅडमिंटन या खेळांवरही त्याचे विशेष प्रेम आहे. धोनी आपले जिममधील किंवा वर्कआउटचे व्हिडीओ कधी सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसत नाही. मात्र त्यांने आज एक भन्नाट व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत त्याचे सायकलिंगवरील प्रेम दिसत आहे. मंगळवारी त्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

Just for fun, plz try it at home.

A post shared by M S Dhoni (@mahi7781) on

या व्हिडिओत धोनी सायकलवर स्टंट करताना दिसत आहे. आपल्या ऑफिशिअल इंस्टाग्राम अकाउंट वरून त्याने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ अत्यंत मजेशीर असून ‘ केवळ मजा म्हणून हा स्टंट तुम्ही निर्धास्तपणे आपल्या घरी करू शकता’, असेही धोनी त्या बरोबर लिहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here