मंगळवारी Netflix ने Sacred Games च्या नवीन सीजनसाठी अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोतवणे आणि वरून ग्रोवर यांच्या सोबत येणाऱ्या सीजन मधेही राहणार असल्याचे स्पष्ट केले. कश्यप आणि मोतवणे हे Sacred Games चे डायरेक्टर आहेत तर वरून ग्रोवर हे त्या सीजनचे लेखक आहे. Netflix हे सध्या इंटरनेट वरील सध्याचे सर्वात स्ट्रीम होणारे ऍप्प आहे.

अनुराग कश्यप आणि मोतवणे यांनी ही सिरीज को-डायरेक्ट केली होती. ‘विकास बहल’ यांनी त्यांच्या इम्प्लॉयीला लैंगिकरीत्या हरॅस केल्या प्रकरणी या सर्वांनाच मोठ्या त्रासांना सामोरं जावं लागतं आहे, कारण विकास बहल हे त्यांचे पार्टनर आहेत. #MeToo मूव्हमेंट मध्ये गेल्या महिन्यात जेंव्हा त्यांच्या आरोपाची तीव्रता जास्त होती तेंव्हा प्रोडक्शन हाऊस बंद करावे लागले होते.

विकास बहल यांच्यावर झालेले आरोप व ती घटना ही 2015 साली गोव्यामध्ये घडली होती. यांच्यासोबतच लेखक ‘वरून ग्रोवर’ यांच्यावर सुद्धा लैंगिक हरॅसमेंटचे आरोप झाले आहेत. परंतु वरून ग्रोवर ने ते आरोप साफ खोटे असल्याचे सांगितले आणि खारीज करून टाकले आहेत.

Netflix ने म्हटले की, “आमच्या स्वतंत्र चौकशी नंतर जे रिझल्ट आले, त्यांनी आम्हाला पुढच्या निर्णयासाठी वाट दाखवली आहे आणि त्यामुळे Netflix ने Sacred Games season 2 साठी परत अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोतवणे यांच्या सोबत काम करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यासोबतच लेखक म्हणून वरून ग्रोवर यांना सुद्धा पुढे season 2 साठी काम करण्याची संधी मिळाली आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here