निकच्या वाढदिवशी म्हणजेच १६ सप्टेंबर रोजी हा लग्नसोहळा पार पडणार असल्याचं म्हटलं जात आहे.

गुपचूप साखरपुडा उरकल्यानंतर अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास सप्टेंबर महिन्यात विवाहबंधनात अडकणार असल्याचं म्हटलं जात आहे. ‘डीएनए’नं दिलेल्या वृत्तानुसार निकच्या वाढदिवशी म्हणजेच १६ सप्टेंबर रोजी हा लग्नसोहळा पार पडणार आहे.

प्रियांकाच्या वाढदिवशीच या दोघांनी साखरपुडा केल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांत ऐकायला मिळाल्या. अनेक परदेशी माध्यमांनी या दोघांचा साखरपुडा झाल्याच्या वृत्ताला पुष्टी दिली जात आहे. वर्षभरापासून प्रियांका आणि निक एकमेकांना डेट करत आहे. २०१७ साली पार पडलेल्या मेट गालाच्या इव्हेंटमध्ये प्रियांका आणि निक हे जोडपं पहिल्यांदा दिसलं. तेव्हापासून या दोघांच्या नात्याची चर्चा होती. त्यावेळी प्रियांकानं वेगळंच कारण सांगत वेळ मारून नेली होती. मात्र मे २०१८ पासून हे जोडपं अनेकदा न्यूयॉर्कमध्ये एकत्र वेळ घालवताना दिसलं तेव्हापासून निक आणि प्रियांकाच्या नात्याची पुन्हा एकदा जोरदार चर्चा झाली. पण, दोघांही कधीही आपल्या नात्याला अधिकृतरित्या नातं आहे हे सिद्ध करत नव्हते .

प्रियांका ३६ वर्षांची आहे तर निक २५ वर्षांचा आहे. निकच्या २६व्या वाढदिवशी ही दोघं आपल्या आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार असल्याचं म्हटलं जात आहे. प्रियांका आणि निक याची अधिकृत घोषणा कधी करतील याकडे चाहत्यांचं लक्ष आहे.