salman khan

बॉलीवूड मध्ये सुपरहिट झालेल्या चित्रपटांचे सिक्वेल काढण्याची प्रथा सुरू झाली आहे. मागे सुपरहिट झालेल्या चित्रपटाचा सिक्वेल ही सुपरहिट होईल या आशेने हे सिक्वेल काढले जातात. अशाच प्रकारच्या एका चित्रपटाचा सिक्वेल लवकरच आपल्याला मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. 2005 मध्ये बनलेला आणि “अनिस बजमी” निर्देशक असलेला ‘No Entry‘ या कॉमेडी चित्रपटाचा लवकरच सिक्वेल येत आहे. ‘No Entry‘ च्या सिक्वेल ची गोष्ट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होती. परंतु आतापर्यंत त्यावर काहीच झाले नव्हते.

No Entry च्या सिक्वेलला घेऊन नुकतीच एक गोष्ट पुढे आली आहे की, लवकरच या सिक्वेलच्या शूटिंगचे काम सुरू करण्यात येईल. परंतु या सिक्वेल मधील मोठी गोष्ट ही आहे की, यामध्ये अभिनेता अर्जुन कपूर आपल्याला दिसणार आहेत. अर्जुन कपूरने नुकतंच या चित्रपटासाठी मंजुरी दिली आहे. या सिक्वेल ची घोषणा करताना निर्देशक अनिस ने म्हटले की सलमान खान एक उत्कृष्ट ऍक्टर आहेत आणि मला त्यांच्या सोबत काम करणे आवडेल. परंतु जर सलमान खान या सिक्वेल मध्ये नसतील तर मग एखादा दुसरा ऍक्टर त्यासाठी शोधावा लागेल आणि त्याच्यानुसार स्क्रिप्ट तयार करावी लागेल.

सलमानच्या एन्ट्री बद्दल चर्चा सुरूच होती तेवढ्यात बातमी आली की, सलमान खानच्या जागी आता अर्जुन कपूरला घेण्यात आले आहे. पहिल्या ‘No Entry‘ मध्ये सलमान खान, फरदीन खान, अनिल कपूर, लारा दत्ता आणि बिपाशा बासु यांनी मुख्य कलाकार म्हणून काम केले होते. या चित्रपटासाठी अर्जुन कपूर आणि अनिल कपूर हे दोघेच फिक्स कलाकार आहेत बाकीच्या कलाकारांचा शोध अजून चालू आहे. हा चित्रपट अर्जुन कपूरचे वडील बोनी कपूर प्रोड्युस करणार आहेत. आधीची No Entry सुद्धा त्यांनीच प्रोड्युस केली होती. या सिक्वेल ची शूटिंग सप्टेंबर 2019 मध्ये चालू होईल आणि 2020 मध्ये हा चित्रपट रिलीज करण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here