सिनेमागृहात बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास कोणताही प्रतिबंध असेल असा नियम नाही. शुक्रवारी 13 जून रोजी नागपूरमध्ये झालेल्या एका विधानसभेच्या बैठकीत भारतीय जनता पार्टीचे नेते आणि महाराष्ट्राचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रवींद्र चौहान यांनी सांगितले की, ऑगस्टनंतर सिनेमागृहांमध्ये बाहेरील खाद्यपदार्थवर घेऊन जाण्याची परवानगी देण्यात येईल.

मात्र यातही तुमची अडवणूक केली तर त्या भागातील पोलीस ठाण्याशी संपर्क साधता येऊ शकतो.सिनेमागृहांचे नियमन शासनाकडून देण्यात आले आहे. सरकारने खाद्यपदार्थ नेण्यास बंदी नसल्याचे यापूर्वीही स्पष्ट केले आहे.

त्यामुळे पोलिसांनी आपल्या विभागातील सिनेमागृहात खाद्यपदार्थाची परवानगी देण्याबाबत चे निर्णय घ्यावेत,असे सरकारकडून सांगण्यात आले आहे.